मुंबई पोलिसांनी पहिल्यांदाच ‘आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स’ (AI) टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून दोन सराईत गुन्हेगारांना चोरीच्या मुद्देमालासह अटक केली आहे. मुलुंड पोलिस ठाण्यातील (Mulund Police Station) गुन्हा प्रकटीकरण पथकाने या टेक्नॉलॉजीचा वापर करून जबरी चोरीतील दोन जणांना ठाणे आणि मुंब्रा परिसरातून अटक करून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे.
मुलुंड पश्चिम मुलुंड कॉलनी, येथे राहणारे कुणाल गणपत राठोड (Kunal Ganpat Rathod) (३६) हे २४ मार्च रात्री ११ वाजता रोजी मुलुंड कॉलनी मलबार हिल रोड येथे उभे होते, दरम्यान मोटारसायकल वरून आलेल्या दोन जणांपैकी एकाने कुणाल राठोड (Kunal Ganpat Rathod) यांच्या हातातील मोबाईल फोन खेचून पळ काढला. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
(हेही वाचा – मुंबई महानगराच्या विकासाला गती; MMRDA चा ४०,१८७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी (Ajay Joshi) यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि गणेश मोहिते, पो.ह.किरण चव्हाण, मोहन निकम, विवेक शिंपी आणि मनोज मोरे या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. एका पथकाने मुलुंड परिसरातील सीसीटिव्ही तपासून गुन्हयामधील आरोपीतांनी वापरलेली दुचाकी निश्चित केली आणि दुसऱ्या पथकाने तक्रारदार यांचा चोरीला गेलेल्या मेाबईल फोन मधील लाॅग इन असलेला इ-मेल आयडी आणि पासवर्ड बाबतची माहिती तक्रारदार यांचेकडून प्राप्त केली आणि गुगल डॅश बोर्ड या आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स (AI) या टेक्नोलाॅजीचा वापर करून मुंब्रा, ठाणे परिसरातून गुन्हयामध्ये चोरी झालेला मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकीसह दोन जणांना अटक करण्यात आली.
मुजमिल सलीम मुलानी (२६) आणि बिसुराज भरत अधिकारी (२९) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत, मुजमिल हा स्विगी डिलिव्हरी बॉय असून तळोजा नवीमुंबई येथे राहण्यास आहे. बिसुराज हा खिंडीपाडा दर्गा रोड, मुलुंड पश्चिम येथे राहणारा आहे. मुजमिल याच्याविरुद्ध मुलुंड आणि भांडुप पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती वपोनि. अजय जोशी (Ajay Joshi) यांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community