भिंवडीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा! १९ विद्यार्थी ताब्यात

प्रातिनिधिक

भिवंडी येथे मेरी पाठशाला या संस्थेच्यावतीने सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात धक्कादायक प्रकार घडला. आंदोलक विद्यार्थ्यांनी यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी यावेळी १९ आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

( हेही वाचा : नव्या वर्षात तुमच्या ‘या’ सुट्ट्या जाणार वाया! पहा संपूर्ण यादी… )

भाषण देताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

भिंवडी येथे गेल्या ३ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या विद्यार्थ्यांना मेरी पाठशाला या संस्थेने पाठबळ दिले आहे. मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी या विद्यार्थ्यांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. परंतु या आंदोलनादरम्यान एका विद्यार्थ्याने भाषण देताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यानंतर याठिकाणी गोंधळ सुरू झाला.

१९ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

या घडलेल्या प्रकारची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची होऊन पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यामध्ये आतापर्यंत १४ पुरूष आणि ५ महिला अशा १९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here