Cyber Crime : बँक मॅनेजरच्या सतर्कतेमुळे सापडला सायबर फसवणुकीसाठी खाते उघडून देणारा संशयित

76
Cyber Crime : बँक मॅनेजरच्या सतर्कतेमुळे सापडला सायबर फसवणुकीसाठी खाते उघडून देणारा संशयित
Cyber Crime : बँक मॅनेजरच्या सतर्कतेमुळे सापडला सायबर फसवणुकीसाठी खाते उघडून देणारा संशयित
परदेशात बसून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सायबर माफियासाठी बँकांमध्ये अनेक उघडून देणारा तरुण बँक मॅनेजरच्या सतर्कतेमुळे पकडला गेला आहे. या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याने एकाच बँकेत ३५ जणांचे खाते उघडून दिल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीत समोर आला, हा प्रकार कुर्ला पश्चिम येथे उघडकीस आला  असून कुर्ला पोलिसांनी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला मात्र त्याला अटक न करता नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. लवकरच पुढील तपासासाठी त्याला बोलविण्यात येईल असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (Cyber Crime)
अमीर फिरोज मनियार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राहणारा आहे. कुर्ला पश्चिम येथे असणारी ‘पंजाब नॅशनल’ बँकेत सतत वेगवेगळ्या लोकांना येणाऱ्या एका तरुणांवर बँकेचे मॅनेजर संजय कुमार दास यांना संशय आल्याने त्यांनी त्या तरुणांकडे यापूर्वी चौकशी केली होती, त्यावेळी त्याने नातेवाईकाना खाते उघडून देण्यास येत असल्याचे सांगितले होते.   (Cyber Crime)
त्यानंतर काही कारण नसताना हा तरुण बँकेच्या एटीएम सेंटर तसेच बँकेच्या आता फिरताना आढळून आल्याने दास यांचा त्यांच्यावरील संशय वाढला होता, दरम्यान त्यांच्या बँकेकडे सायबर फसवणुकीच्या अनेक तक्रारीचे पत्र आले होते, दरम्यान बँक मॅनेजर यांनी या तरुणाने विविध लोकांचे बँकेत उघडलेल्या खात्याची माहिती आणि तपशील मागवून घेतला असता अनेक खात्यावर मोठ्या रकमा ऑनलाईन जमा झाल्याच्या आणि त्या रकमा परदेशातून काढण्यात आलेल्या नोंदी आढळून आल्या. तसेच प्रत्येक खातेदारांच्या नावावर ‘व्हिसा कार्ड’ घेण्यात आले होते. (व्हिसा कार्ड  हे जगभरात कुठेही चालते)  (Cyber Crime)
१९ नोव्हेंबर रोजी हा संशयित तरुण बँकेच्या एटीएम जवळ घुटमळत असताना बँक मॅनेजरला आढळून आले असता सुरक्षा रक्षकांच्या मदतीने या तरुणाला बँक मॅनेजर दास यांनी त्यांच्या केबिन मध्ये बोलावून घेतले. दास यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता एटीएम पिन जनरेट करण्यासाठी आलो असल्याची माहिती त्याने दास यांना दिली, त्याने उघडून दिलेल्या खातेदारांची माहिती विचारली असता ते सर्व माझे नातलग असून आमचा आयात निर्यात हा व्यवसाय असल्याचे त्याने सांगितले,आणि  त्याने १० खातेदारांची नावे लिहून दिली, ही नावे पडताळत असताना दास यांच्या लक्षात आले की, त्यांना एक गैरव्यवहाराबद्दल (ऑनलाईन फसवणूक) आलेल्या मेल मध्ये १० खात्यापैकी एकाचा खातेक्रमांक आणि नाव आढळून आले. दास यांचा संशय खरा ठरला आणि त्यांनी तात्काळ कुर्ला पोलिसांना याबाबत सूचना दिली.  (Cyber Crime)
कुर्ला पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी बँकेत धाव घेऊन बँक मॅनेजर यांची तक्रार दाखल करून घेत संशयित तरुण मणियार याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले,पोलिसांनी मणियार याने उघडून दिलेल्या खात्याची माहिती बँकेकडून घेतली असता सप्टेंबर २०२४ पासून त्याने पंजाब नेशनल बँकेत ३५ जणांचे खाते उघडून दिल्याचे समोर आले, प्रत्येक खात्यावर मोठ्या रकमाचे ऑनलाईन व्यवहार झाल्याचे आढळून आले तसेच या खात्यातील पैसे परदेशात व्हिसा कार्डच्या माध्यमातून काढण्यात आल्याचे तपासात समोर आले. कुर्ला पोलिसांनी बँक मॅनेजर यांच्या तक्रारीवरून अमीर फिरोज मणियार या तरुणा विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करून  त्याला अटक न करता नोटीस देऊन सोडण्यात आले. लवकरच त्याला या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेऊ अशी माहिती कुर्ला पोलीस ठाण्यातील एका अधिकारी यांनी दिली.  (Cyber Crime)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.