सायबर गुन्हेगाराकडून आर्थिक फसवणुकीसाठी मुंबई पोलीस आयुक्तांनाच टार्गेट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर गुन्हेगाराकडून पोलीस आयुक्त यांचे नाव वापरून मेल, व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा फोन कॉल करून लोकांना अटकेची नोटीस पाठवली जात आहे. दरम्यान आयुक्तांकडून या नोटीस बाबत खंडन करण्यात आले असून ही नोटीस बनावट असून असली कुठलीही नोटीस मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आलेली नाही, बनावट अटकेच्या सूचनेवर विश्वास ठेवू नका किंवा त्याला प्रतिसाद देऊ नका, तसेच नागरिकांनी या संदेशांना बळी न पडता त्वरित आम्हाला कळवावे असे आवाहन खुद्द मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) यांनी ‘एक्स’ हँडल वर केले आहे. (Cyber Crime)
मुंबई पोलीस आयुक्तांकडून अटकेची नोटीस आल्यास तात्काळ आमच्या निदर्शनास आणून द्यावे.
मुंबई पोलीस आयुक्त यांच्या वतीने कोणत्याही प्रकारचा मेल, व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा फोन कॉलवर आलेल्या कोणत्याही बनावट अटकेच्या सूचनेवर विश्वास ठेवू नका किंवा त्याला प्रतिसाद देऊ नका.
नागरिकांनी या… pic.twitter.com/bcLCzJut6r
— पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई – CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) September 14, 2024
सायबर गुन्हेगारांचे जाळे संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात पसरले आहे. सायबर गुन्हेगाराकडून नागरिकांची आर्थिक फसवणुक करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहे. सायबर गुन्हेगाराकडून सध्या ‘डिझिटल अरेस्ट’ नावाने लोकांकडून लाखो रुपये उकळण्याचे प्रकार सुरू आहे. सायबर गुन्हेगार हा स्वतःला सीबीआय, ईडी, गुन्हे शाखा, सायबर क्राईम सेल चे अधिकारी सांगून पीडितांना व्हिडीओ कॉल करून त्यांचा मोठ्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे भासवून त्यांना डिझिटल अरेस्ट करण्यात आले असल्याचे सांगून तास न तास व्हिडीओ कॉल वर अडकवून ठेवतात, त्यानंतर त्यांना ‘फिझिकल अरेस्ट’ (प्रत्यक्षात अटक) करण्याची भीती दाखवून अटक टाळण्यासाठी खंडणीच्या स्वरूपात मोठ्या रकमा उकळण्यात येत आहे. (Cyber Crime)
डिझिटल अरेस्ट पाठोपाठ सायबर गुन्हेगारांनी आता थेट मुंबई पोलीस आयुक्तांचा वापर करून लोकांना ईमेल, व्हाट्सअप्प, तसेच थेट कॉल करून अटकेच्या नोटीस पाठवल्या जात आहे. या नोटीसवर मुंबई पोलीस आयुक्त यांच्या नावाचा उल्लेख करून नोटीस पाठवल्या जात आहे. हा प्रकार मुंबई पोलिसांच्या लक्षात येताच मुंबई पोलीस आयुक्तां कडून या नोटीसीचे खंडन करण्यात आले असून ही नोटीस बनावट असून असली कुठलीही नोटीस मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आलेली नाही, बनावट अटकेच्या सूचनेवर लोकांनी विश्वास ठेवू नका किंवा या नोटीसीला प्रतिसाद देऊ नका, तसेच नागरिकांनी या संदेशांना बळी न पडता त्वरित आम्हाला कळवावे असे आवाहन खुद्द मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) यांनी ‘एक्स’ हँडल वर केले आहे. (Cyber Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community