Isis चे दहशतवादी कनेक्शन उघड करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘दक्षता पदक’ जाहीर!

80
Isis चे दहशतवादी कनेक्शन उघड करणाऱ्या अधिकाऱ्यांना 'दक्षता पदक' जाहीर!
Isis चे दहशतवादी कनेक्शन उघड करणाऱ्या अधिकाऱ्यांना 'दक्षता पदक' जाहीर!

कोथरूड परिसरात पुणे पोलिसांनी दहशतवादी पकडणाऱ्या पुणे पोलिस दलातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक व पुढे तपास पुणे दहशतवादी विरोधी पथकाकडे गेल्यानंतर मोठी साखळी ब्रेक करणाऱ्या अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक (Dakshata Medal) जाहीर करण्यात आले आहे. (Isis)

(हेही वाचा-UPI द्वारे विक्रमी व्यवहार झाले; जाणून घ्या किती कोटींची झाली उलाढाल?)

तत्कालीन कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत चंद्रकांत पाटील तसेच दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस अधीक्षक जयंत मीना, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गवारी, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील चव्हाण आणि सहायक पोलिस चंद्रकांत लोहकरे यांचा यामध्ये सहभाग आहे. (Isis)

(हेही वाचा-छत्तीसगडमध्ये वाहनांवर भगवे झेंडे लावून Christian Missionaries यांचा धर्म प्रचार)

मोहम्मद शहानवाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख आणि तलाह लियाकत खान, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान ऊर्फ मटका ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (रा. रतलाम मध्यप्रदेश), मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी ऊर्फ अदिल ऊर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्यप्रदेश), कदीर दस्तगीर पठाण ऊर्फ अब्दुल कदीर (रा. कोंढवा, पुणे), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा पुणे), जुल्फेकार अली बडोदवाला ऊर्फ लालाभाई ऊर्फ लाला ऊर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (रा. तिघेही रा. पडघा, ठाणे) आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. (Isis)

(हेही वाचा-इएसएच्या प्रोबा-3चे ISRO करणार प्रक्षेपण)

सध्या ठाणे पोलिस आयुक्तालयांतर्गत राबोडी पोलिस स्टेशन येथे वरीष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले हेमंत चंद्रकांत पाटील हे जुलै २०२३ मध्ये पुणे आयुक्तालयांतर्गत कोथरूड पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यावेळी पुणे शहराचे बिट मार्शल वरील पोलिस अंमलदार हे हद्दीमध्ये गस्त घालत असताना त्यांनी तिघांना दुचाकी चोरताना पकडले होते. पुढे हे तिघेही दहशतवादी असल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच त्यांचा संबंध इसिस या दहशतवादी संघटनेशी असल्याचे निष्पन्न झाले होते. (Isis)

पकडलेल्या तिघांपैकी एक जण कोंढव्यातून पळून गेला होता. पुढे या प्रकरणाची लिंक ही आंतरराष्ट्रीय पातळीवर असल्याने या प्रकरणाचा तपास पुणे एटीएस आणि एनआयए करत होती. पुढे पुणे एटीएसच्या अधिकाऱ्यामुळे पडघा येथील मोठी दहशतवादाची लिंक मिळाली. दहशतवादी कारवाईसाठी पूरक असे पुरावेही तपास यंत्रणांच्या हाती लागले. या दहशत वाद्यांनी पुणे सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची तसेच त्यांनी घातपातासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे प्रशिक्षण घेतल्याचे माहीती तपासात उघड झाली होती. (Isis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.