सासूला विष दिल्याची सुनेची कबुली, पोलीस शोधणार पुरावे

99

जेवणात विषारी धातू देऊन पतीची हत्या करणाऱ्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने सासूच्या जेवणात देखील विष कालवले असल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. याबाबतचे पुरावे शोधण्यासाठी पोलिसांकडून या दोघांविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या गुन्ह्याचे पुरावे शोधण्यासाठी तपास पथकाकडून सासू सरलादेवी हिच्या करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचण्यांची तज्ञाकडून पडताळणी करून पुरावे गोळा केला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात एसटीची वाहतूक अंशत: रद्द)

सांताक्रूझ येथील व्यवसायिक कमलकांत शहा याच्या हत्येप्रकरणात गुन्हे शाखेच्या अटकेत असलेले काजल शहा (४५) आणि तिचा प्रियकर हितेश जैन (४५) यांनी सरला देवी (६५) यांना अन्नात आर्सेनिक आणि थॅलियम दिल्याचे पोलिसांकडे कबूल केले आहे, त्यातूनच सरलादेवी हिला त्रास होऊन ज्यामुळे १३ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. सांताक्रूझ (पश्चिम) येथील कपड्यांचे व्यावसायिक असलेल्या सरलादेवी यांचा मुलगा कमलकांत शहा (४६) यांचा १९ सप्टेंबर रोजी शरीरातील सर्व अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. कमलकांत यांच्या रक्तात मोठ्या प्रमाणात आर्सेनिक आणि थेलियम हे विषारी धातू आढळले होते. कमलकांत यांची आई सरलादेवी हिचा देखील मृत्यू ‘मल्टिपल ऑर्गन फेलिव्हर’ (शरीरातली सर्व अवयव निकामी होऊन) झाला होता. परंतु तिच्या मृत्यूचे खरे निदान होऊ शकले नव्हते. त्यानंतर सरलादेवीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यामुळे पुरावे देखील त्यात जळाले. कमलकांत शहाच्या रक्ताच्या चाचणीत मात्र डॉक्टरांना आर्सेनिक आणि थेलीयम हे विषारी धातू आढळून आल्यामुळे त्याच्या आजराचे निदान होऊ शकले आणि हे विष अन्नात अथवा पेयात दिल्याशिवाय हे शरीरात जाणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.

कमलकांत याच्या मृत्यूनंतर त्याच्या शवाचे विच्छेदन करण्यात आले होते, व बहिणीच्या तक्रारीवरून मुंबई गुन्हे शाखेने १ डिसेंबर रोजी हत्येचा गुन्हा दाखल करून पत्नी कविता उर्फ काजल आणि तिचा प्रियकर हितेश जैन या दोघांना अटक केली आहे. कमलकांतच्या हत्येचे पुरावे पोलिसांना मिळून आले असले तरी कमलकांत यांच्या आईच्या मृत्यूबाबतचे कुठल्याही प्रकारचे पुरावे पोलिसांच्या हाती नसल्यामुळे आईच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. मात्र पोलिसांच्या चौकशीत हितेश आणि काजल यांनी सरलादेवी हिला देखील अन्नातून विष दिल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. परंतु पोलिसांच्या हाती याबाबत ठोस पुरावे नसल्यामुळे प्रथम पोलीस सरलादेवीच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे पुरावे शोधत आहे, यासाठी पोलिसांकडून सरलादेवीवर ज्या रुग्णालयात उपचार करण्यात आले होते, तेथून कागदपत्रे तसेच तिच्या वैद्यकीय चाचण्या करणाऱ्या पॅथोलॉजी लॅबोरेटरीचे कागदपत्र गोळा करून फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच ज्या पॅथोलॉजी मध्ये सरलादेवीच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आलेल्या आहेत, त्या पॅथोलोजी लॅब संपर्क साधून सरलादेवीचे घेतलेल्या नमुन्यापैकी काही नमुने मिळतात का याची माहिती काढण्यात येत आहे. सरलादेवी मृत्यू संबंधात पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांना प्रथम सु-मोटो गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.