Suicide : ‘आयएएस’ दाम्पत्याच्या मुलीची इमारतीच्या १०व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या

454
Suicide : 'आयएएस' दाम्पत्याच्या मुलीची इमारतीच्या १०व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या

महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या दाम्पत्यांच्या २७ वर्षांच्या मुलीने मुंबईतील कफ परेड येथील राहत्या इमारतीच्या १०व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (३ जून) पहाटे उघडकीस आली. लिपी रस्तोगी असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे, ती सोनीपत हरियाणा येथे एलएलबीचे शिक्षण घेत होती, शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीमुळे ती चिंतेत होती अशी माहिती परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. (Suicide)

विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी हे दाम्पत्य महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी असून विकास रस्तोगी हे उच्च शिक्षण तंत्रज्ञान विभागाचे सचिव आहेत. नरिमन पॉईंट येथील सुरुची या शासकीय इमारतीत हे दाम्पत्य राहत होते. त्यांची २७ वर्षांची मुलगी लिपी ही सोनीपत हरियाणा येथे एलएलबीचे शिक्षण घेत होती, सुट्टीमध्ये ती मुंबईत आई वडिलांकडे आली होती, व त्यांच्यासोबत सुरुची इमारत येथे राहत होती. सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास इमारती वरून काही तरी पडण्याचा आवाज होताच सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली असता एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. (Suicide)

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : अमेरिकेत विराट कोहली भोवती कडेकोट सुरक्षा )

सुरक्षा रक्षकांनी इमारतीत राहणाऱ्यांना याबाबत सूचना दिली. रहिवाश्यांनी घटनास्थळी धाव घेतली व तरुणीची ओळख पटविण्यात आली. लिपी रस्तोगी असे या तरुणीचे नाव असून ती आयएएस दाम्पत्य विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांची कन्या आहे. रहिवासी आणि सुरक्षा रक्षकांनी विकास रस्तोगी यांना याबाबत सूचना दिली असता तिला तात्काळ जीटी रुग्णालयात आणण्यात आले, डॉक्टरांनी लिपीला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच कफ परेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार लिपी हिने इमारतीच्या १०व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली असून तिने मृत्यूपूर्वी लिहलेली सुसाइड नोट पोलिसांना मिळून आली आहे. (Suicide)

लिपी ही सोनीपत हरियाणा येथे एलएलबीचे शिक्षण घेत होती, ती अभ्यासाला घेऊन खूप चिंतेत होती, लिपीने लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये तिने आपल्या मृत्यूसाठी कोणालाच जबाबदार धरू नये असे म्हटले आहे अशी माहिती परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. कफ परेड पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जीटी रुग्णालयात पाठविण्यात आलेला असून कफ परेड पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे असे पोलीस उपायुक्त मुंढे यांनी सांगितले. (Suicide)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.