Dawood Drug Connection : कवठेमहांकाळ ड्रग्सचे दाऊद कनेक्शन उघड, परदेशात बसलेल्या दाऊद च्या सदस्याला लूक आउट नोटीस

Dawood Drug Connection : मुंबई गुन्हे शाखा कक्ष ७ च्या पथकाने गेल्या महिन्यात मुंबईतील सर्वात मोठे एमडी या अमली पदार्थाचे रॅकेट उध्वस्त करून एका महिलेसह ११ जणांना अटक करण्यात आली होती.

165
Dawood Drug Connection : कवठेमहांकाळ ड्रग्सचे दाऊद कनेक्शन उघड, परदेशात बसलेल्या दाऊद च्या सदस्याला लूक आउट नोटीस
Dawood Drug Connection : कवठेमहांकाळ ड्रग्सचे दाऊद कनेक्शन उघड, परदेशात बसलेल्या दाऊद च्या सदस्याला लूक आउट नोटीस

मुंबई गुन्हे शाखेकडून उध्वस्त करण्यात आलेल्या सांगली जिल्ह्यातील ड्रग्स कारखाना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Drug Connection) निकटवर्तीय सलीम डोला यांच्या इशाऱ्यावरून चालत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे. सलीम डोला हा दुबई, तुर्की या देशातून मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाच रॅकेट चालवत आहे. या रॅकेटमध्ये त्याचवेळी मुलगा ताहीर डोला याचा देखील समावेश आढळून आला आहे. गुन्हे शाखेने सलीम डोला,ताहीर डोला याच्याविरुद्ध लूक आउट नोटीस (एलओसी)जारी केली आहे. (Dawood Drug Connection)

(हेही वाचा- औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका Bombay High Court फेटाळली)

मुंबई गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch) कक्ष ७ च्या पथकाने गेल्या महिन्यात मुंबईतील सर्वात मोठे एमडी या अमली पदार्थाचे रॅकेट (Dawood Drug Connection) उध्वस्त करून एका महिलेसह ११ जणांना अटक करण्यात आली होती. सांगलीतील कवठेमहांकाळ येथे असणारा एमडीचा कारखाना उध्वस्त करून जवळपास २५२ कोटींचा एमडी जप्त करण्यात आला होता. या ठिकाणी एमडी तयार करून प्रत्येक किलो मागे एक लाख रुपये कमाई करणारा प्रवीण उर्फ नागेश रामचंद्र शिंदे (३६) त्याचे साथीदार वासुदेव लक्ष्मण जाधव (२५), प्रसाद बाळासो मोहिते (२४),विकास महादेव मलमे (२५),अविनाश महादेव माळी (२८), लक्ष्मण बालु शिंदे (३५)यांना अटक करण्यात आली होती. (Dawood Drug Connection)

मुंबईतील मीरा रोड येथून साजिद मोहम्मद आसिफ शेख उर्फ डेबस,सुरत मधून इजाजअली इमदाद अली अन्सारी (२४) आणि आदिल इम्तीयाज बोहरा (२२) या दोघांना अटक करण्यात आली होती. तर कुर्ला येथून परवीन बानो शेख (३३) या महिलेला अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या या अकरा जणांकडून गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणात एमडी हा ड्रग्स कोट्यवधी रुपयांची रोकड, वाहने जप्त करण्यात आली होती. (Dawood Drug Connection)

(हेही वाचा- Pakistan : पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्याकडून १०० मुलांचे लैंगिक शोषण)

गुन्हे शाखेने केलेल्या या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा केला असता, हे रॅकेट आंतरराष्ट्रीय पातळीचे या रॅकेट मध्ये दाऊद इब्राहिम याचे कनेक्शन आढळून आले आहे. इकबाल मिर्ची यांच्यासोबत एकेकाळी मुंबईत ड्रग्सचा (अमली पदार्थ) अवैध धंदा करणारा सलीम डोला हा गुन्हे शाखेने उध्वस्त केलेल्या ड्रग्स रॅकेटचा मुख्य म्होरक्या आहे. डोलासह त्याचा मुलगा ताहीर डोला, मुस्तफा खुबावला,सालेम शेख यांची नावे या रॅकेट मध्ये समोर आली असून गुन्हे शाखेने या पाच चौघांची नावे या गुन्ह्यात नोंद केली आहे. हे चौघे भारता बाहेर असून त्यांच्या विरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे. (Dawood Drug Connection)

सांगली येथून अटक करण्यात आलेला प्रवीण उर्फ नागेश हा एमडी तयार करीत होता, एमडी बनविण्यासाठी त्याने उत्तर प्रदेशात प्रशिक्षण घेतले आहे, प्रवीण हा सलीम डोला याच्या संपर्कात आला व त्याच्या मागणीनुसार तो एमडी तयार करून देत होता, एमडी बनविण्यासाठी लागणारी आर्थिक रसद सलीम डोला हा हवालामार्फत प्रवीणला पुरवत होता. प्रवीण उर्फ (Pravina urpha) नरेश हा एमडी तयार करून डोलाच्या माणसांना देत होता बदल्यात एका किलो एमडी मागे त्याला एक लाख रुपये मिळत होते अशी माहिती समोर आली. (Dawood Drug Connection)

(हेही वाचा- IPL 2024, SRH vs LSG : सनरायझर्स हैद्राबादच्या पराभवामुळे या गतविजेत्या संघाचं आव्हान संपुष्टात)

मुंबईतून फरार असलेला आणि परदेशात बसलेला ड्रग्स तस्कर सलीम डोल विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम याच्या हजारो कोटींचे ड्रग्ज २०१८ मध्ये मुंबई पोलिसांनी पकडले होते. परदेशात बसून डोला गुजरात आणि मुंबईला सागरी मार्गाने ड्रग्जचा पुरवठा करतो. डोलाचा बिझनेस हजारो कोटींचा आहे. भारतात राहत असताना सलीम डोला दाऊद इब्राहिम आणि इक्बाल मिर्ची यांच्यासोबत मिळून अंमली पदार्थांचा व्यवसाय करत असे, त्याला मुंबई पोलिसांनी वेळोवेळी तर कधी डीआरआयने अटक केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलीम डोला समुद्रमार्गे आणि वेगवेगळ्या मार्गाने परदेशात ड्रग्ज पाठवतो. गृहमंत्रालयाने ड्रग माफिया आणि अंमली पदार्थांच्या व्यापाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत मुंबईतून पळून गेलेला आणि परदेशात बसलेला मोस्ट वॉन्टेड ड्रग तस्कर सलीम डोला याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. (Dawood Drug Connection)

अमली पदार्थांपासून बनवलेली प्रचंड संपत्ती….. 

२०१८ मध्ये मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने हजारो कोटींचे फेंटॅनाइल ड्रग जप्त केले होते. त्या प्रकरणी सलीम डोला ला अटक करण्यात आली होती. नंतर डोला सलीमला जामीन मिळाला आणि तो परदेशात फरार झाला. डोला सलीमही गुजरात एटीएसला हवा आहे. सलीम डोला मूळचा मुंबईतील शिवडी येथे राहण्यास होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सलीम डोलाचा हजारो कोटींचा व्यवसाय असून त्याने अमली पदार्थांपासून अमाप संपत्ती कमावली आहे. (Dawood Drug Connection)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: उपनगरात २,७२८ जणांचे गृहमतदान! जिल्ह्यात २०० पथकांची नियुक्ती)

ड्रग्स माफिया मध्ये आणखी एक नाव हाजी सलीम ….

या वर्षी भारतातून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून यामध्ये अनेक बडे ड्रग माफिया सामील आहेत, हे विशेष. हाजी सलीम हे माफियांमध्ये एक नाव आहे. हाजी सलीम हा दाऊद इब्राहिम आणि एलटीटीई या दोघांचा जवळचा असल्याचे सांगितले जाते. सलीमला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडूनही मदत केल्याच्या वृत्त आहे. हाजी सलीम हा पाकिस्तानस्थित गुंड असून तो कराचीमध्ये राहतो आणि ड्रग्सचे नेटवर्क चालवतो. त्याचा व्यवसाय इराण, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि हिंदी महासागरातून जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. (Dawood Drug Connection)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.