कराची विमानतळावर कुख्यात गुंड दाऊदचा कब्जा

134

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे पाकिस्तानशी असलेले संबंध कोणापासूनही लपून राहिलेले नाहीत. आता दाऊद इब्राहिमबाबत असे काही खुलासे झाले आहेत, ज्यावरून त्याचा पाकिस्तानमधील प्रभाव दिसून येतो. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानमधील कराची या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताबा मिळवला आहे. दाऊदचे नातेवाईकही विमानतळावर कोणत्याही चौकशीविना प्रवेश करतात आणि बाहेर पडतात. एवढेच नाही तर त्यांना दुबईपर्यंत प्रवास करण्यासाठी इमिग्रेशन क्लिअरन्स किंवा कोणत्याही स्टॅम्पची गरज पडत नाही. 

विमानतळावर दाऊदच्या माणसांना थेट प्रवेश 

टेरर फंडिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूट याला अटक केली होती. यानंतर एनआयएने सलीम फ्रूट याच्या पत्नीचा जबाब नोंदवला होता. सलीम फ्रुट यांच्या पत्नीच्या जबाबानुसार पाकिस्तानातील विमानतळ अंडरवर्ल्डच्या ताब्यात आहेत. दाऊदचे नातेवाईक किंवा मित्र जेव्हा पाकिस्तानात येतात तेव्हा त्यांची नोंदही विमानतळावर होत नाही. म्हणजेच दाऊदच्या ओळखीच्या लोकांना चेक इन आणि चेक आउट न करता पाकिस्तानात सहज प्रवेश मिळतो. टेरर फंडिंगच्या तपासात गुंतलेल्या एनआयएला चौकशीदरम्यान कळले आहे की, कराची विमानतळ डी-कंपनीच्या ताब्यात आहे. परिस्थिती अशी आहे की, दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसह त्याच्या कुटुंबातील सदस्य किंवा डी कंपनीसोबत व्यावसायिक व्यवहार करणाऱ्यांसाठी आलेल्या लोकांच्या पासपोर्टवर शिक्काही मारला जात नाही.

(हेही वाचा भारतीय कुस्तीतही #MeToo; ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटू उतरल्या ‘मैदानात’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.