वरळी सी फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

252
वरळी सी फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका तरुणीवर मुंबई लोकलमध्ये झालेल्या विनयभंगाची घटना ताजी असतांना आणखी एका तरुणीच्या हत्येची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खरंच मुंबईत महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

(हेही वाचा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रथमच महाराष्ट्र दौऱ्यावर)

मुंबईच्या वरळी सी फेसवर एका गोणीमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील वरळी सी फेसवर एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला. एका गोणीत हा मृतदेह होता. हात-पाय तुटलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह गोणीत होता. वरळी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणीचं वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

तरुणीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली असा अंदाज वरळी पोलिसांनी व्यक्त केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.