दीड वर्षाच्या मुलाला ४ दिवसात दिले ४ इंजेक्शन, गॅंगरीनमुळे बाळाचा मृत्यू! जळगावात डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल

105

जळगावमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दीड वर्षीय बाळाचा जळगावमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संबंधित डॉक्टरांच्या विरोधात जळगावमध्ये गुन्हा दाखल झाला असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

( हेही वाचा : “माझी कामं पटली, तर लोक मतं देतील नाहीतर देणार नाहीत…मी आता लोणी लावणार नाही”; गडकरींनी स्पष्टच सांगितलं)

जळगावातील पाथरी येथील दुर्वेश नाना पाथरवट या दीड वर्षीय बाळाला ताप आल्याने गावातील डॉक्टरांनी या बाळाला चार दिवसात ३ कमरेवर आणि १ हातावर असे चार वेळा इंजेक्शन दिले. या इंजेक्शनमुळे बाळाच्या कमरेवर सेफ्टिक होऊन कमरेपासून ते मांडीपर्यंक गॅंगरीन झाले होते. यामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.

नेमके प्रकरण काय ? 

मृत बाळाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार डॉ. स्वप्नील युवराज पाटील, युवराज पाटील आणि डॉ. सुभाष जाधव या डॉक्टरांविरोधात एमआडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीड वर्षीय बालक दुर्वेश पाथरवट आईसोबत मामाच्या गावी राहत होता. त्याला ताप आल्याने कुटुंबियांनी पाथरी गावातील दवाखान्यात नेले होते. दुर्वेशला यावेळी कमरेवर इंजेक्शन आणि गोळ्या देण्यात आल्या परंतु त्याला पुन्हा ताप आल्या तेव्हा त्याला पुन्हा दोन्ही कमरेवर इंजेक्शन व गोळ्या देण्यात आल्या. यानंतर कोणताही फरक न होता त्रास वाढत होता, दुर्वेशला इंजेक्शन दिलेल्या जागी दुखत होते शेवटी त्याला पुढील उपचारासाठी जळगावला पाठविले आणि तेव्हा बाळाला गॅंगरीन झाल्याचे समोर आले.

गॅंगरीन होऊन बाळाचा मृत्यू

शस्त्रक्रिया करताना रक्ताचे सॅंपल घेण्यापूर्वी बाळाचा मृत्यू झाला होता. यानंतर त्याचे अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. डॉ. स्वप्नील युवराज पाटील, युवराज पाटील आणि डॉ. सुभाष जाधव यांना इंजेक्शन देण्याची परवानगी नाही तरी त्यांनी इंजेक्शन दिले. या अहवालात इंजेक्शन दिल्यामुळे गॅंगरीन होऊन बाळाचा मृत्यू झाला असे नमूद करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.