मूळची आसाम राज्यातील नूर मालबिका दास (Noor Malabika Das) या अभिनेत्रीचा मुंबईतील ओशिवरा येथील राहत्या घरात गळफास लावलेला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये काजोल सोबत काम करणारी अभिनेत्री नूर ही अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी कतार एअरवेजची एअर होस्टेस होती. सोमवारी सकाळी तिच्या मुंबईतील ओशिवरा येथील राहत्या घरातून कुजलेला दुर्गंध येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शेजाऱ्यांच्या मदतीने तिच्या घराचे दार उघडू आत प्रवेश केला असता नूर ही पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. (Noor Malabika Das)
पोलिसांनी नूरचा (Noor Malabika Das) मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालय येथे पाठविण्यात आला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री नूर ही दीर्घ काळापासून डिप्रेशनने त्रस्त होती आणि तिच्यावर औषधोपचार सुरु होते. नैराश्यामुळे तिने आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, नूरच्या घराच्या झडतीदरम्यान पोलिसांना अभिनेत्रीचा मोबाईल फोन आणि डायरीसह काही औषधे सापडली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, नूरवर ज्या डॉक्टरांच्या उपचाराखाली उपचार केले जात होते, त्याचे प्रिस्क्रिप्शनही सापडले आहे, ज्यामध्ये नूरला आपला राग आटोक्यात ठेवता येत नसल्याचे लिहिले आहे. (Noor Malabika Das)
(हेही वाचा – मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर Coastal Road चा दुसरा बोगदा मार्गही खुला)
नूर सोशल मीडियावर सक्रिय होती आणि इंस्टाग्रामवर तिचे १६३,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स होते. अवघ्या पाच दिवसांपूर्वी तिने स्वतःचा एक आनंदी व्हिडिओ शेअर केला होता. नूरने तिच्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये कॅप्शनमध्ये लिहिले की, एकच चेहरा आहे आणि तो म्हणजे नूर मालबिकाचा (Noor Malabika Das) चेहरा. असा चेहरा जो इतर कोणाशीही जुळत नाही आणि तो पाहण्यासाठी तिला आरशाची गरज नाही. “माझे सौंदर्य हे तुझे प्रतिबिंब आहे,” तिने लिहिले. या शेवटच्या पोस्टमध्ये, तिने तिच्या जगाचे तिचे आरसे म्हणून वर्णन केले आहे. (Noor Malabika Das)
नूरने १८ दिवसांपूर्वी तिने स्वत:चे मुंडण केले होते, तिने स्वत:चे मुंडण करतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला होता. नूर ३२ वर्षांची होती आणि ती आसामची होती. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने कतार एअरवेजमध्ये एअर होस्टेस म्हणून काम केले. ‘द ट्रायल’ व्यतिरिक्त, नूरने ‘सिसकियां’, ‘वॉकमन,’ ‘तीखी चटनी,’ ‘जगन्या उपे,’ ‘चरमसुख,’ ‘देखी अंधेखी’ आणि ‘बॅकरोड हसल’ यांसारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले होते. (Noor Malabika Das)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community