Delhi : दोन रुग्णालयांनंतर आता IGI विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी, तपास सुरू

रविवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरही धमकीचा ईमेल आला.

234
Delhi : दोन रुग्णालयांनंतर आता IGI विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी, तपास सुरू

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत बुरारी सरकारी रुग्णालय आणि मंगोलपुरीतील संजय गांधी रुग्णालयाला रविवारी ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरही (Indira Gandhi International Airport) धमकीचा ईमेल (Fake Mail) आल्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हॉस्पिटल आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्याच मेल आयडीवरून ईमेल पाठवण्यात आला आहे. तसेच दुपारी तीनच्या सुमारास हा ईमेल पाठवण्यात आला. मात्र, पोलीस तपासात अद्याप विमानतळावर काहीही सापडले नाही. अशी माहिती मिळाली. (Delhi)

(हेही वाचा – S Jaishankar : भारत-चीन संबंधांसाठी सीमेवर शांतता हवी; एस जयशंकर यांचे महत्त्वाचे विधान)

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने रुग्णालयाच्या ॲडमिन ब्लॉकमध्ये मेलची माहिती उशिरा मिळाली. हा मेल समजताच संचालक, इतर अधिकारी आणि डॉक्टरही रुग्णालयात पोहोचले आहेत. जीटीबी हॉस्पिटलमध्ये (GTB Hospital) चेंगराचेंगरी होऊ नये आणि लोकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रुग्ण आणि नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली नाही. सध्या पोलीस आणि बॉम्बशोधक पथक तपास करत आहेत. (Delhi)

या रुग्णालयांना धमकीचा मेल आला:
  • संजय गांधी हॉस्पिटल, मंगोलपुरी
  • जानकी देवी हॉस्पिटल, शादीपूर
  • बडा हिंदुराव हॉस्पिटल, मलकागंज
  • ईएसआयसी हॉस्पिटल, बसई दारापूर
  • जनकपुरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जनकपुरी
  • एनसी जोशी मेमोरियल हॉस्पिटल, करोल बाग
  • जीटीबी हॉस्पिटल, दिलशाद गार्डन

चौकशीत ही धमकी खोटी निघाली

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पोलिस आणि बॉम्ब निकामी पथके (बीडीटी) सध्या दोन्ही रुग्णालयात उपस्थित आहेत. सध्या काहीही संशयास्पद आढळले नसून शोधमोहीम सुरू आहे. मात्र दोन्ही रुग्णालयांमध्ये बॉम्बच्या धमकीचे वृत्त आल्यानंतर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (Delhi)

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात 17.7 कोटी मतदार करणार उमेदवारांचे भविष्य सीलबंद)

काही दिवसांपूर्वी शाळांनाही अशाच धमक्या आल्या होत्या

पोलीस उपायुक्त (उत्तर) मनोज कुमार मीना म्हणाले, बुरारी सरकारी रुग्णालयात बॉम्बची धमकी दिल्याबद्दल एक ईमेल प्राप्त झाला होता. अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही. अग्निशामक विभाग आणि इतर संबंधित विभागांना देखील रुग्णालयांकडून मिळालेल्या ईमेलबद्दल माहिती देण्यात आली, असे आणखी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, काही दिवसांपूर्वी दिल्लीतील Delhi NCR मध्ये १०० हून अधिक शाळांना बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यानंतर शाळेत विद्यार्थ्यंमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. संबंधित यंत्रणेला माहिती मिळताच शोधमोहिमेला सुरुवात झाली.  (Delhi)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.