दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर येथील राव आयएएस कोचिंग सेंटरच्या (Delhi Coaching Incident) तळघरात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्यानंतर मृतांचा आकडा आता तीनवर पोहोचला आहे. यूपीएससीची कोचिंग सेंटरमध्ये पावसाचे पाणी (heavy rain) शिरले. हे पाणी इतक्या प्रमाणात होते की यामध्ये विद्यार्थ्यांच्या बुडून मृत्यू (IAS Aspirant Death) झाला. हे तिन्ही विद्यार्थी आयएएसची तयारी करणारे होते.
Delhi: Students protest against MCD, IAS coaching institute after basement flooding claims three lives
Read @ANI Story | https://t.co/30EAnmFPp0#couchinginstitiuteincident #RajenderNagar #NDRF #DelhiPolice pic.twitter.com/VGufD3eXfh
— ANI Digital (@ani_digital) July 28, 2024
याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी
या दुर्घटनेत श्रेया, तान्या आणि नेविन या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. श्रेया ही उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगरमधील रहिवासी आहे. तर तान्या सोनी ही मूळची तेलंगणाची आहे. नेविन डालविन हा केरळमधील तरुण या दुर्घटनेत मरण पावला. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यानंतर दिल्ली सरकारने न्यायादंडाधिकाऱ्यांकरवी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी मुख्य सचिवांना याप्रकरणी २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (Delhi Coaching Incident)
विद्यार्थ्यांचे सरकारविरोधात ठिय्या आंदोलन
दुसऱ्या बाजूला राजेंद्र नगर भागात राहून यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत केली. यावेळी विद्यार्थी म्हणाले, अद्याप कोणीही या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. सरकारमधील कोणीतरी येथे यावं आणि या दुर्घटनेत दगावलेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यावी असं आम्हाला वाटतं. ते लोक त्यांच्या वातानुकूलित घर अथवा कार्यालयात बसून ट्वीट करून किंवा पत्र लिहून विद्यार्थ्यांचं भविष्य सुधारू किंवा ठरवू शकत नाहीत. (Delhi Coaching Incident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community