दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी राऊज अव्हेन्यू न्यायालयाने बुधवारी, (२६ जून) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ३ दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवले. तसेच न्यायालयाने (Delhi Court) आपल्या आदेशात म्हटले आहे की, सीबीआयला केजरीवाल यांना २९ जून रोजी सायंकाळी ७ वाजण्यापूर्वी न्यायालयात हजर करावे लागेल.
Rouse Avenue Court sends Delhi Chief Minister & AAP Convenor Arvind Kejriwal to 3 days CBI remand in connection with Excise policy case.
— ANI (@ANI) June 26, 2024
बुधवारी सीबीआयने कथित दारू घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. सीबीआयने राऊज एव्हेन्यू कोर्टात (Rouse Avenue Court) केजरीवाल यांची ५ दिवसांची कोठडी मागितली होती. तत्पूर्वी, न्यायालयाने सीबीआयला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अधिकृतपणे अटक करण्याची परवानगी दिली. विशेष न्यायाधीश अमिताभ रावत यांच्या आदेशानंतर सीबीआयने केजरीवाल यांना अटक केली. केजरीवाल यांना अटक करण्याची परवानगी देण्याची विनंती केंद्रीय तपास यंत्रणेने न्यायालयाला केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community