Delhi Crime :माणुसकीला काळिमा : गर्लफ्रेंडने केली बॉयफ्रेंडच्या मुलाची हत्या

बेडमध्ये लपवला मृतदेह, दिल्लीमधील घटना 

169
Delhi Crime :माणुसकीला काळिमा : गर्लफ्रेंडने केली बॉयफ्रेंडच्या मुलाची हत्या
Delhi Crime :माणुसकीला काळिमा : गर्लफ्रेंडने केली बॉयफ्रेंडच्या मुलाची हत्या

 दिल्लीतल्या इंद्रपुरी Delhi Crime भागात  एका ११ वर्षांच्या मुलाची हत्या झाल्याची घटना घडली . तर या घटनेचा शोध घेताना पोलिसांना धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे . बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी तरुणीने त्याच्या मुलाची हत्या केली. ही बाब कुणालाही कळू नये म्हणून ११ वर्षांच्या मुलाचा मृतदेह बेडमध्ये लपवून ठेवला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून हत्येचं हे प्रकरण उघडकीस आलं आहे.

दिल्लीतील Delhi दिव्यांश (बिट्टू) या मुलाची हत्त्या Delhi Crime झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी २४ वर्षीय पूजाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बॉयफ्रेंडने फसवणूक केल्यामुळे पूजाच्या मनात प्रचंड राग होता. त्यामुळे पूजाने बिट्टूची हत्या केली. १० ऑगस्ट रोजी दुपारी बिट्टू घरात झोपला होता त्यावेळी पूजाने त्याचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह बेडमध्ये लपवून ठेवला होता. पूजा आणि जितेंद्र हे दोघे २०१९ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत  होते. जितेंद्रने आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायचं वचन पूजाला दिलं होतं. २०२२ मध्ये पूजाला सोडून जितेंद्र पुन्हा त्याच्या पत्नीकडे परतला. त्यानंतर तो त्याच्या पत्नीसह आणि मुलासह राहू लागला. या सगळ्या प्रकारानंतर पूजा चिडली होती. जितेंद्रचा राग पूजाच्या मनात होता. पूजा आणि जितेंद्र या दोघांच्या नात्यात बिट्टू येत होता त्यामुळे जितेंद्र लग्नाला विरोध करत आहे असं पूजाला वाटत होतं. त्यामुळे जितेंद्रला धडा शिकवण्यासाठी पूजाने हे पाऊल उचललं.

३०० सीसीटीव्ही 300 cctv कॅमेरांची घेतली मदत 

१० ऑगस्टला एका कॉमन मित्राच्या मदतीने पूजाने जितेंद्रच्या घराचा पत्ता विचारुन घेतला. पूजा जितेंद्रच्या घरी पोहचली तेव्हा दरवाजा उघडाच होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा जेव्हा जितेंद्रच्या घरी पोहचली तेव्हा जितेंद्रच्या घरी कुणी नव्हतं आणि बिट्टू बेडवर झोपला होता. घरात कुणी नाही हे संधी पूजाने साधली. त्यानंतर पूजाने बिट्टू गळा आवळून जीव घेतला. त्यानंतर त्याचा मृतदेह बेडमध्ये लपवला आणि तिथून पळ काढला. पूजाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ३०० सीसीटीव्ही कॅमेरांची मदत घेतली. नजफगढ, नागलोई रोड, रनहौला, निहाल विहार आणि रिशल गार्डन या भागातले ३०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यानंतर तीन दिवसांनी पूजाला बक्कारवाला भागातून अटक केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.