Delhi Dragging Case : दिल्लीतील धक्कादायक घटना! कारचालकांनी फरफटत नेलेली मुलगी सापडली विवस्त्र अवस्थेत

राजधानी दिल्लीत घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. स्कूटीवरून घरी जाणाऱ्या मुलीला कार चालकाने धडक दिली. ही तरूणी स्कूटीवरून खाली पडली आणि कारच्या चाकात अडकली. त्या कार चालकाने गाडी न थांबवता यू-टर्न घेतला आणि या तरुणीला तब्बल ७ ते ८ किलोमीटर फरफटत नेले. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला आहे.

( हेही वाचा : धक्कादायक: पुण्यात 100 रुपयांसाठी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला)

दिल्ली पोलिसांकडून ५ जणांना अटक

रविवारी पहाटे ४ वाजता या मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला. फरफटत नेल्यामुळे हा पीडित मुलीची सगळी हाडे मोडून तिचा मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांना कांजवाला परिसरातून पीसीआर कॉल आला. रस्त्यात्या कडेला एक जखमी तरुणी विवस्त्र अवस्थेत पडल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. तरुणी बलेनो कारच्या खाली अडकली असून कार चालक तिला ओढून यू-टर्न घेताना दिसत आहे. मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मंगोलपुरी येथील संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून पोलिसांनी दीपक खन्ना (२६), अमित खन्ना (२५), कृष्णा (२७), मिथुन (२६) आणि मनोज मित्तल यांना अटक करण्यात आली आहे.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here