Delhi Hit and Run: रॅपिडोच्या बाईक रायडरला सरकारी अधिकाऱ्याने २ किमीपर्यंत फरफटत नेलं आणि…

158
Delhi Hit and Run: रॅपिडोच्या बाईक रायडरला सरकारी अधिकाऱ्याने २ किमीपर्यंत फरफटत नेलं आणि...
Delhi Hit and Run: रॅपिडोच्या बाईक रायडरला सरकारी अधिकाऱ्याने २ किमीपर्यंत फरफटत नेलं आणि...

रॅपिडो ऍपसाठी बाईक रायडर म्हणून काम करणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघात (Delhi Hit and Run) झाला आहे. दरम्यान, कार चालकाने दुचाकीला धडक देऊन तिला २ किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अपघात झाला त्यावेळी कार दिल्ली सरकारचा अधिकारी चालवत असल्याची माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे. त्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुदैवानं या अपघातातून दुचाकीस्वार बचावला आहे.

हिट अँड रन
दुचाकीला दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्यानंतर कारने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले. त्यांनी कारला लागलेली आग विझवली. दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासली. त्यातून हा प्रकार हिट अँड रनचा असल्याचं समजलं. यानंतर पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पांढऱ्या रंगाची क्रेटा भरधाव वेगात रॅपिडो बाईकला धडक देताना दिसत आहे. (Delhi Hit and Run)

२ किमीपर्यंत दुचाकी फरफटत गेली
कारने इतक्या वेगात धडक दिली की दुचाकीस्वार हवेत उडाला. पण त्याची दुचाकी कारच्या पुढील भागात अडकली. अपघातानंतर कार चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने कारचा वेग वाढवला. त्यामुळे जवळपास २ किमीपर्यंत दुचाकी फरफटत गेली. झंडेवालान परिसरात असलेल्या व्हिडीओकॉन टॉवरजवळ क्रेटानं पेट घेतला. कारनं पेट घेतल्याचं लक्षात येताच चालकानं ब्रेक लावला. कार थांबताच तो लगेच बाहेर आला. या अपघातात कार आणि दुचाकी जळून खाक झाली. (Delhi Hit and Run)

अपघातावेळी कार चालक मद्यधुंद अवस्थेत?
या प्रकरणी पोलिसांनी बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कार चालकाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहेत. अपघातावेळी कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. आर. सी. मीणा असं कार चालकाचं नाव आहे. (Delhi Hit and Run)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.