देशाच्या राजकारणात ईडीच्या (Delhi Liquor Scam) भीतीने अनेक घडामोडी घडतांना आपण पहिल्या आहेत. मोठ्या मोठ्या नेत्यांनाही ज्या ईडीच्या कारवाईचा धाक वाटतो त्याच ईडीच्या एका अधिकाऱ्याला लाच घेण्याच्या आरोपाखाली सीबीआयने अटक केली आहे. त्यामुळे आता दिल्ली दारू (Delhi Liquor Scam) घोटाळ्यात नवा ट्विस्ट आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआयने अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) सहायक संचालक पवन खत्री (Delhi Liquor Scam) यांना अटक केली आहे. मद्यविक्रेते अमनदीप सिंग धल्ल यांच्याकडून ५ कोटींची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
पवन खत्री यांच्यासोबतच ‘यांच्यावर’ गुन्हा दाखल
सीबीआयने दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीचे सहायक संचालक पवन खत्री, एअर इंडियाचे कर्मचारी दीपक सांगवान, क्लेरिजेस हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे सीईओ विक्रमादित्य आणि इतर आरोपींविरुद्ध (Delhi Liquor Scam) गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या नावाने लाच घेणार गट कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – China’s New Map : चीनच्या कुरापती : ‘अरुणाचल प्रदेश आमचाच’; चीनकडून पुन्हा नवीन नकाशा जाहीर)
अटकेपासून वाचवण्याचे आश्वासन
प्रवीण वत्स यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दीपक सांगवान यांनी काही पैशांच्या बदल्यात (Delhi Liquor Scam) अमनदीप सिंग धल्ल यांना अटकेपासून वाचवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी डिसेंबर २०२२ मध्ये प्रवीण वत्सची ओळख ईडी अधिकारी पवन खत्री यांच्याशी करून दिली. प्रवीण वत्स यांनी डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत अमनदीप धल्ल यांच्याकडून प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या सहा हप्त्यांमध्ये ३ कोटी रुपये घेतले.
CBI has registered a case against Pawan Khatri, Assistant Director ED, Deepak Sangwan employee of Air India, Vikramaditya CEO of Claridges Hotels & Resorts and others accused in connection with the ongoing delhi liquor scam case.
— ANI (@ANI) August 28, 2023
त्यानंतर दीपक सांगवान (Delhi Liquor Scam) यांनी अमनदीप धल्ल यांच्याकडे आणखी दोन कोटी रुपयांची मागणी केली. दोन कोटी रुपये दिल्यास तुमचे नाव आरोपींच्या यादीतून वगळले जाईल, असे आश्वासन त्यांनी धल्ल यांना दिले. अमनदीप धल्ल यांनी सांगवान यांची ही मागणीही पूर्ण केली. मात्र, सांगवान यांनी आश्वासन दिल्यानंतरही ईडीने अमनदीप धल्ल यांना १ मार्च २०२३ रोजी अटक केली.
लाच घेतल्याचे पुरावे सापडले
या प्रकरणाची (Delhi Liquor Scam) चौकशी करणाऱ्या ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संस्थेतील काही अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचे पुरावे सापडले. त्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community