Shraddha Murder Case : जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाचीच! वडिलांशी DNA झाला मॅच, दिल्ली पोलिसांना मोठे यश

199

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी संपूर्ण देश हादरला, आरोपी आफताब पूनावालाने श्रद्धाचे ३५ तुकडे करत तिच्या शरीराचे भाग जंगलात फेकले होते. दिल्ली पोलिसांना तपासादरम्यान मेहरोलीच्या जंगलात हाडे सापडले होती. जंगलात सापडलेले पुरावे आणि हाडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांशी जुळला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

( हेही वाचा : देशात येणार नवी टोल सिस्टिम! आता थेट कापले जाणार पैसे; काय आहे ही नवी योजना?)

या प्रकरणी आरोपी आफताब पूनावालाची पोलिग्राफ आणि नार्को टेस्ट करण्यात आली होत. परंतु आता हाडांचा डीएनए मॅच झाल्यामुळे पोलिसांना तपासात मोठे यश आले आहे. दरम्यान श्रद्धा वालकर आणि आफताब हे दोघेही भाड्याने राहत असलेल्या घरात पोलिसांनी रक्ताचे डाग सुद्धा सापडले होते. त्या रक्ताचा डीएनए सुद्धा श्रद्धा वालकरच्या वडिलांशी जुळला आहे. यामुळे आफताबनेच श्रद्धाची हत्या केल्याचे सिद्ध झाले आहे.

दिल्ली पोलिसांनी आफताबच्या खोलीतून आणि मेहरौली येथील जंगलातून हत्याकांडातील हाड, जुने रक्ताचे डाग असे नमुने गोळा केले होते आणि ते तपासासाठी सीएफएसएल आणि एफएसएलकडे पाठवले होते. याचा डीएनए रिपोर्ट आला असून त्याचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांशी जुळला असल्याची माहिची समोर आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.