Shraddha Murder Case : जंगलात सापडलेले नमुने श्रद्धाचेच! वडिलांशी DNA झाला मॅच; पॉलिग्राफ चाचणीत धक्कादायक माहिती उघड

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी दिल्ली पोलिसांना आतापर्यंतच्या तपासात मोठे यश मिळाले आहे, पोलिसांना जंगलातून काही नमुने मिळाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाचे वडील मदन विकास वालकर यांच्याशी नमुन्यांचा डीएनए जुळला आहे. यामुळे आता तपासाला आणखी वेग आलेला आहे. तसेच डीएनए जुळल्यामुळे आरोपी आफताब अमीन पूनावालाच्या अडचणीत सुद्धा वाढ होणार आहे.

( हेही वाचा : रेल्वेच्या UTS अ‍ॅपवरून तिकीट-पास काढताय? नियमांमध्ये झालाय मोठा बदल, जाणून घ्या…)

दिल्ली पोलिसांनी आफताबच्या खोलीतून आणि मेहरौली येथील जंगलातून हत्याकांडातील हाड, जुने रक्ताचे डाग असे नमुने गोळा केले होते आणि ते तपासासाठी सीएफएसएल आणि एफएसएलकडे पाठवले होते. त्यातील काहींचा डीएनए रिपोर्ट आला असून त्याचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांशी जुळला असल्याची माहिची समोर आली आहे.

आफताबची पॉलीग्राफ चाचणी

श्रद्धा हत्याकांड प्रकरणी आफताबची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीदरम्यान, हत्येनंतर दृष्यम हा चित्रपटही पाहून पुरावे नष्ट केले असे आफताबने सांगतिले आहे. यावेळी आफताबला श्रद्धाशी संबंधित पन्नासहून अधिक प्रश्न विचारण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here