दिल्ली पोलिसांनी आर्टीफिशिअल इंटेलिजिअन्सच्या (AI) आधारे एका हत्येचा उलगडा केला आहे. तर या तंत्रज्ञानाच्या आधारे फक्त पोलिसांनी आरोपीची ओळखच पटवली नाही तर मुख्य आरोपीनाही बेड्या ठोकल्या. पोलिसांना १० जानेवारीला पूर्व दिल्लीत गीता कॉलनी फ्लायओव्हरच्या खाली एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी शवविच्छेदन केलं असता गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याचे उघड झाले आहे. पण पोलिसांना मृतदेहावर किंवा जवळ ओळखीचा कोणताच पुरावा न सापडल्याने मोठं आव्हान उभं राहिलं होतं. (Delhi Crime)
यांनतर दिल्ली पोलिसांनी सध्या चर्चेत असणाऱ्या AI तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे खराब झाला असल्याने पारंपरिक पद्धतीने त्याची ओळख पटवणं अशक्य होत. यामुळे पोलिसांनी AI च्या सहाय्याने मृतदेहाचा चेहरा पुन्हा व्यवस्थित केला. अशाप्रकारे पोलिसांनी त्याला डिजिटल पद्धतीने पूर्ण स्पष्ट केलं. (Delhi Crime)
(हेही वाचा : Rohit Pawar यांची ईडीकडून तब्बल १२ तास चौकशी)
पोलिसांनी यांनतर मृत व्यक्तीचे ५०० पोस्टर्स छापले आणि वेगवेगळ्या ठिकाणी चिकटवले.याशिवाय त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवरही हा फोटो शेअर करत ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु केला. अखेर त्या फोटोमुळेच पोलिसांना पाहिलं यश मिळाल. एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला आणि हा आपला मोठा भाऊ हितेंद्र असल्याचं सांगितलं. यांनतर पोलीस तपासाला वेग आला. पोलिसांनी चौकशी केल्यावर हितेंद्रचा तीन जणांशी वाद झाला होता. त्यातुन हाणामारी झाली अशी माहिती मिळाली. तर तिन्ही आरोपींनी हितेंद्रची गळा दाबून हत्या केली होती. यांनतर त्यांनी पुरावे लपवण्यासाठी एका महिलेची मदत घेतली होती. पोलिसांनी माहिती मिळताच महिलेसह चौघांना अटक केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community