हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या Maulana Sajid Rashidi वर गुन्हा दाखल करण्याची मागणी

87
हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या Maulana Sajid Rashidi वर गुन्हा दाखल करण्याची मागणी
हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या Maulana Sajid Rashidi वर गुन्हा दाखल करण्याची मागणी
एका हिंदी वृत्त वाहिनीवर प्रसारित झालेल्या पॅनल चर्चे दरम्यान हिंदू देवतां बाबत आक्षेपार्ह विधान करून हिंदूच्या भावना दुखावणाऱ्या मौलाना साजिद रशिदी (Maulana Sajid Rashidi) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा असा तक्रार अर्ज अनुराग श्रीवास्तव (Anurag Srivastava) यांनी खारघर पोलीस ठाण्यात दिला आहे. या अर्जावरून मौलाना साजिद रशिदीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी श्रीवास्तव यांनी पोलिसांकडे केली आहे.
मौलाना साजिद रशीद (Maulana Sajid Rashidi) याने १० ऑक्टोबर रोजी एका हिंदी वृत्त वाहिनीवर पॅनल चर्चे दरम्यान हिंदू देवताबाबत आक्षेपार्ह आणि निंदनीय विधान केले होते, मौलाना साजिद याने केलेल्या या विधानामुळे  देशभरातील हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत.
कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या स्पष्ट हेतूने हे विधान केवळ हिंदू धार्मिक श्रद्धांचा थेट अपमानच नाही तर गंभीर आक्षेपार्ह आहे. त्यांचे विधान केवळ अपमानजनकच नाही तर ती प्रक्षोभक देखील आहेत, ज्याचा उद्देश धार्मिक समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे आहे असे तक्रारदार अनुराग श्रीवास्तव तक्रारीत म्हटले आहे. (Maulana Sajid Rashidi)
मौलाना रशिदी हे द्वेषयुक्त भाषणे करण्यासाठी प्रसिद्ध व्यक्ती आहेत आणि सार्वजनिक व्यासपीठावरील अशा विधानांमध्ये देशभरातील जातीय सलोखा आणि शांतता बिघडवण्याची शक्यता असल्यामुळे  मौलाना साजिद रशीद यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 कलम 299 – (कोणत्याही धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धेचा अपमान करून त्याच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये) कलम 196-( धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इ.च्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि सद्भाव राखण्यासाठी प्रतिकूल कृती करणे) कलम 353(सार्वजनिक गैरकारभार करणारी विधाने) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अनुराग श्रीवास्तव यांनी  खारघर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे. (Maulana Sajid Rashidi)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.