मुंबई पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (Mumbai police ACP ) कार्यालय ज्या ठिकाणी आहे, त्याच जागेचे बनावट कागदपत्रे (forged documents) तयार करून शासनाच्या जागेवर दावा सांगणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चेंबूर येथील टिळक नगर पोलीस ठाण्यात (Tilak Nagar Police station) राजन शामम गुल्हाने याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेंबूर (chembur) येथील पेस्तम सागर या ठिकाणी देवनार विभागाचे ( Deonar ACP Office) सहायक पोलिस आयुक्तयांचे कार्यालय आहे, तसेच कार्यालय समोर मोकळी जागा आहे. या भूखंडाच्या मालकी हक्कावरून महाराष्ट्र् शासन maharastra Gov.) आणि भारत सरकार (center govt.) (सॉल्ट विभाग) ( SALT division) वाद सुरू असून हे प्रकरण दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे.या प्रलंबित भूखंडावर सॉल्ट विभागाकडून नोटीस फलक (notice board) लावण्यात आला आहे.
दरम्यान या नोटीस फलकावर राजन शामम गुल्हाने याने आपला बोर्ड लावून सदर भूखंड (plot) हा गुल्हाने यांच्या मालकीचा असून या जागेवर कोणीही अतिक्रमण करू नये,अन्यथा कायदे शीर कारवाई केली जाईल असे फलकावर लिहण्यात आले होते. तसेच राजन गुल्हाने याने टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला, त्यात त्याने सदरचा भूखंड त्याच्या वडिलांच्या नावे असून आमच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून नोटीस फलक आणि पत्रे लावण्यात आले असल्याची तक्रार अर्ज आणि जागेचे कागदपत्रे १६ मे २०२३ पोलीस ठाण्याला दिले.दरम्यान भारत सरकारच्या सॉल्ट विभागा कडून राजन गुल्हाने याच्या विरुद्ध तक्रार दाखल करुन सॉल्ट विभागाकडून पोलिस ठाण्यात कागदपत्रे सादर करण्यात आली होती.
याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक तयार करून दोन्ही तक्रारी सोबत आलेली वादग्रस्त भूखंडाचे कागदपत्रे तपासण्यासाठी (Mulund tahsil office) तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालय मुलुंड येथे पाठविण्यात आली व या संदर्भात तहसील कार्यालयाला पोलिसांनी पत्र देऊन याबाबतची माहिती मागविण्यात आली.
तहसील कार्यालय येथून आलेल्या अहवालात राजन गुल्हाने याने सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले,तसेच सदर भूखंड हा महाराष्ट्र सरकारच्या मालकीचे असून ७/१२ उतारा आणि मालमत्ता पत्रकात (property card) महाराष्ट्र सरकारची नोंद असून त्यात कुठेही गुल्हाने किंवा सॉल्ट विभागाचा उल्लेख नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
टिळक नगर पोलिसांच्या तपासात असे उघडकीस आले की राजन गुल्हाने याने या भूखंडाच्या ७/१२ उतारा आणि नकाशामध्ये खाडाखोड करून बनावट कागदपत्रे तयार करून महाराष्ट्र सरकारच्या नावे नोंद असलेला भूखंड घशात घालण्याचा प्रयत्न करून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी राजन गुल्हान याच्या विरुद्ध सरकारी दस्तावेज मध्ये खाडा खोड करून बनावट दस्तावेज ( forged documents) तयार करून शासनाची फसवणूक ( cheating ) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तपास सुरू आहे.हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=VF2jVZYKnjY