कल्याणमधील अत्याचाराच्या घटनेनंतर उपसभापती Neelam Gorhe यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना लिहिले पत्र; म्हणाल्या…

572
कल्याणमध्ये एका १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (kalyan Sexual assault) करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याआधी तिचे अपहरण करण्यात आले होते. ही घटना अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असे निर्देश शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाणे पोलीस आयुक्त (Neelam Gorhe) यांना पत्र दिले आहे. (Neelam Gorhe)
२३ डिसेंबरच्या संध्याकाळी १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी बाहेर पडली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली. यामध्ये ठाणे ग्रामीण पडघा पोलीस स्टेशनमध्ये (Padgha Police Station) एफआयआर नोंदविण्यात आला आहे. २४ डिसेंबरला पोलिसांना कल्याणजवळच्या बापगाव या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा मृतदेह फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आला.

(हेही वाचा – Goa : ख्रिसमसच्या दिवशी ‘हात कातरो’ खांबाची पूजा करून पोर्तुगीजांचा निषेध)

हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. माहितीनुसार, यामध्ये आरोपीला त्याच्या पत्नीची साथ दिल्याचे समजते. या प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी पोलीस आयुक्त यांना पत्र दिले असून, त्यात विशेष सूचना दिल्या आहेत. आरोपींना जामीन मिळणार नाही व कठोर शिक्षा होईल यासाठी आवश्यक सर्व पुरावे सादर करावेत. सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच, सरकारच्यावतीने निष्णात अभियोक्त्यांची नियुक्त करावी.
सीसीटीव्ही व पुरावे तपासून घ्यावेत. बाधित कुटुंबास तत्काळ मदत करून समुपदेशन करावे. त्याचबरोबर लहान मुलींचे अपहरण, अत्याचार रोखण्यासाठी एसओपी तयार करण्यात यावा. अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाणे पोलीस आयुक्त यांना दिल्या आहेत.

(हेही वाचा – BMC Hospital : महापालिका रुग्णालयांमधील संक्रमण रोखण्यासाठी सीएसएसडीची स्थापना)

दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी देखील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. माध्यमांना बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, आरोपीला शंभर टक्के फाशीची शिक्षा होईल, यासाठी सरकारकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.