Devendra Fadnavis: एल्विश यादवच्या अटकेवरून देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

120
Devendra Fadnavis: एल्विश यादवच्या अटकेवरून देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
Devendra Fadnavis: एल्विश यादवच्या अटकेवरून देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

लोकप्रिय युट्युबर आणि बिग बॉस फेम एल्विश यादव (Elvish Yadav) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हे प्रकरण रेव्ह पार्ट्यांमध्ये विषारी सापाच्या विषाच्या (Poisonous Snakes) बेकायदेशीर पुरवठ्याशी संबंधित आहे. या सापांचे विष रेव्ह पार्ट्यांमध्ये मादक पदार्थांसाठी वापरले जाते. या मुद्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या प्रकरणी नोएडा पोलिसांनी वनविभागासह 2 नोव्हेंबर रोजी छापा टाकला होता, या छाप्यात 9 सापांसह 5 जणांना अटक करण्यात आली होती. 9 सापांपैकी 5 नाग होते, जे अत्यंत विषारी आहेत. या छाप्यावेळी एक घोडा आणि बिबट्यादेखील जप्त करण्यात आला आहे. याशिवाय आरोपींकडून सापाचे 20 मिली विषही सापडले. आरोपींची चौकशी केली असता, दिल्ली-एन. सी. आर. मधील रेव पार्ट्यांमध्ये सापाचे विष मादक पदार्थांसाठी (Drugs) वापरले जात असल्याची माहिती उघड झाली.

भाजपा नेत्या मनेका गांधी यांच्या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एल्विश यादवने या प्रकरणात राहुल नावाच्या व्यक्तीचा नंबर दिला होता.

उपमुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल… 
या प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते, तेव्हा दरवर्षी सेलिब्रिटी तिथे जातात. विविध क्षेत्रातील दिग्गज त्यांच्या घरी दर्शनासाठी येतात. एल्विशने रियॅलिटी शो जिंकला होता. त्यावेळी एल्विसवर कोणतेही आरोप नव्हते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव या प्रकरणात ओढणे चुकीचे आहे. जर कोणी दोषी आढळला तर त्याला शिक्षा होईल.

(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी गरीब जनतेसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.