Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याप्रकरणी वरळीतून एक जण ताब्यात

380
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याप्रकरणी वरळीतून एक जण ताब्यात
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याप्रकरणी वरळीतून एक जण ताब्यात
“कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी केल्याबद्दल सोशल मीडिया वापरकर्त्यांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्हया प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने एकाला वरळी येथून ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. (Devendra Fadnavis)
राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका व्हिडीओमध्ये फेरफार करून त्यात आक्षेपार्ह विधान जोडण्यात आले होते, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेल ने अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.  (Devendra Fadnavis)
तपासादरम्यान, वरळी येथे राहणारा वरद तुकाराम कणकी नावाच्या एका व्यक्तीला आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात त्याच्या सहभागाबाबत चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आणि तपासणी केली असता त्यात फेरफार केलेला व्हिडिओ असल्याचे आढळून आला, जो  मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला होता. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, कांकी यांना हा व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे मिळाला होता, या व्हाट्सअप्प ग्रुपवर वरळीत राहणारे पद्माकर आंबोळकर यांनी हा  ग्रुपमध्ये प्रथम व्हिडिओ पपोस्ट केला होता. आंबोलकर यांना  चौकशीसाठी गुरुवारी महाराष्ट्र सायबर सेल कार्यालयात बोलाविण्यात आले असून त्यांना रीतसर समन्स बजाविण्यात आले आहे.महाराष्ट्र सायबर सेल चे अधिकारी यांनी म्हटले आहे की, या व्हायरल व्हिडीओची  साखळी शोधून काढण्यात येईल आणि आक्षेपार्ह तयार करणाऱ्या व्यक्तीच्या मुळापर्यंत जाऊन त्या व्यक्तीला लवकरच ताब्यात घेण्यात येईल. या प्रकरणात दोषी आढळलेल्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल. (Devendra Fadnavis)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.