पालघर जिल्ह्यातील मीरारोड येथील नयानगर या मुस्लिमबहुल वस्तीत काही समाजकटकांनी भगवे ध्वज लावलेल्या वाहनावर हल्ले केल्याची घटना रविवारी(२१ जानेवारी) रात्री घडली. या हल्ल्यात ४ जण जखमी झाले असून २० जणांना किरकोळ मार लागला आहे, तसेच अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. (Meera Road Crime)
या हल्ल्यानंतर परिसरात दोन समुदायामध्ये तणाव निर्माण झाला होता. तर १३ जणांना अटक झाली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र्रात कायदा-सुव्यवस्था कुणी बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर खपवून घेतले जाणार नाही असे फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा :Mira Road Stone Pelting : मीरा रोड परिसरात श्रीराम शोभायात्रेवर दगडफेक; पोलिसांचे शांततेचे आवाहन)
काय म्हणाले फडणवीस?
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज तपासून इतर लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. मीरा-भाईंदरमधील काल रात्री घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती घेतली आहे. मी पोलीस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आरोपी ओळखण्याची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र्रात कायदा-सुव्यवस्था कणी बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर खपवून घेतले जाणार नाही.
About the incident occurred last night at Mira Road :
I took detailed info on what happened in NayaNagar in Mira Bhayender last night itself.
Also was constantly in touch with Mira Bhayender CP till 3.30 am.
Police were instructed to take strictest action against the culprits.…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2024
काय होता नेमका प्रकार
पालघर जिल्ह्यातील मीरारोड मधील नयानगर परिसरात रविवारी रात्री भगव्या ध्वजासह श्रीरामच्या जयघोष करीत मिरवणुका निघालेल्या असताना या मिरवणुकीला काही समाजकंटकाकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. भगवे ध्वज लावून श्रीरामचा जयघोष करणाऱ्या वाहनांना अडवून त्याच्यावर हल्ले करण्यात आले आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. जखमीमध्ये चार तरुण गंभीर जखमी झाले असून जवळपास वीस जणांना किरकोळ मार लागला आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मध्यरात्री नयानगर पोलीस ठाण्यात दंगल करणे, समाजात तेढ निर्माण करणे तसेच हत्येचा प्रयत्न करणे अशा विविध कलमातंर्गत गुन्हा करण्यात आलेला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या प्रकरणी नयानगर पोलिसांकडून अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community