धुळे जिल्ह्यात (Dhule District) एका मोठ्या कारवाईत पोलिसांनी ११,००० किलो गांजा जप्त (Marijuana seized) केला. हा गांजा चार ट्रॅक्टरमध्ये भरण्यात आला होता आणि एका अज्ञात व्यक्तीकडून तो बेकायदेशीरपणे वाहतूक केला जात होता. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध NDPS (नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Dhule Drugs Case)
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर पोलीस स्टेशन (Shirpur Police Station, Dhule) परिसरातील निरीक्षक जयपाल हिरे यांच्या म्हणण्यानुसार, मध्य प्रदेशच्या सीमेवरील आंबेगाव गावात तीन एकर शेतात मका आणि हरभऱ्याबरोबर ही गांज्याची शेती केला जात होती. तसेच ठिबक सिंचन तंत्रज्ञानाद्वारे गांजा पिकवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत शेतावर छापा टाकला आणि तेथून चार ट्रॅक्टरमध्ये भरलेला ११,००० किलो गांजा जप्त केला.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे शेत शिरपूर पोलीस ठाण्यापासून फक्त १५ किलोमीटर अंतरावर होते, तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली जात होती. तसेच पोलिसांनी सांगितले की गांजाच्या लागवडीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता.
(हेही वाचा – DCM Eknath Shinde यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात आरोग्य सेवांचा शुभारंभ)
आरोपींचा शोध सुरूच
सध्या या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, परंतु पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे. हा गांजा कुठून पुरवला जात होता आणि त्यामागे कोण कोण सामील आहे हे देखील पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. धुळे आणि आसपासच्या भागात अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत, जिथे बेकायदेशीरपणे अंमली पदार्थांची लागवड केली जात होती. हे संपूर्ण नेटवर्क संपवण्यासाठी पोलीस कठोर कारवाई करत आहेत. लवकरच गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांना अटक केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा – Mumbai-Goa highway वर वाहतूक कोंडी; ५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; प्रवासी ताटकळले)
काय सांगतो कायदा ?
NDPS म्हणजे NARCOTIC DRUGS AND PSYCHOTROPIC SUBSTANCES ACT, 1985. या कायद्याद्वारे, अंमली पदार्थ आणि हेरॉइन, मॉर्फिन, गांजा, चरस, हॅशिश ऑइल, कोकेन, मेफेड्रोन, एलएसडी, केटामाइन, अॅम्फेटामाइन सारख्या मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाची निर्मिती, वाहतूक, बाळगणे, विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाते. या कायद्याच्या कलम 20 नुसार, गांजाची बेकायदेशीरपणे लागवड केल्यास 10 वर्षांपर्यंत सक्तमजुरी आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. NDPS कायद्यानुसार, भारतात गांजाची लागवड करता येत नसली तरी, राज्य सरकारांना याप्रकरणी कायदे तयार करण्याची अनुमती देण्यात आली आहे. देशभरात केवळ उत्तराखंड या राज्यात गांजा लागवडीसाठी सशर्त परवानगी देण्यात आलीय. तर उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि मणिपूर या राज्यांमध्ये गांजावरील संशोधनासाठी लागवड करण्याची परवानगी देण्यात आलीय. शेतामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करून आपण पिकांचं उत्पादन वाढवू शकतो. पण उत्पादन वाढवलं तरी मार्केटमध्ये भावच नाही. दुसरीकडे गांजाला योग्य भाव आहे. त्यामुळे गांजाला पर्यायी पीक म्हणून परवानगी मिळावी अशी मागणी देखील काही शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही पाहा –