Digital Arrest: कंबोडियन टोळीसाठी ‘कॉलर’ म्हणून काम करणाऱ्या एमबीएच्या विद्यार्थ्याला मुंबईत अटक

211
गुजरात राज्यातील अहमदाबाद, येथील एका एमबीए करणाऱ्या विद्यार्थ्याला ‘डिजिटल अटक’ (Digital Arrest) करून ४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी चेतन कोकरे (वय २६ ) हा कंबोडियातील एका आंतरराष्ट्रीय टोळीसाठी ‘कॉलर’ (Collar Chetan Kokre) म्हणून काम करत होता. देशात परताच त्याला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे.
गुजरातमधील सीआयडी गुन्ह्ये शाखेच्या पथकाने राज्यातील ‘डिजिटल अटक’ (Digital Arrest) घोटाळ्याशी संबंधित कॉल करणाऱ्या आरोपीला पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे, सीआयडीच्या राज्य सायबर क्राईम सेलच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी १२ डिसेंबर रोजी ही माहिती दिली.

(हेही वाचा – Navneet Rana यांचा घणाघात; म्हणाले, जनाब उद्धव ठाकरे तुमची… )

कसा रचला गेला कट?
अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी चेतन कोकरे (२६) हा काही महिन्यांपूर्वी कंबोडियाला गेला होता आणि तो चिनी-कंबोडियन (Chinese-Cambodian Gang) नागरिकांच्या टोळीत सामील झाला होता. भारत, पाकिस्तान आणि नेपाळमधील लोकांना बनावट ईडी, सीबीआय, पोलीस किंवा कस्टम्सचे धाक दाखवत त्यांना डिजिटल अरेस्ट करून त्यांच्या कडून पैसे उकळायचा. तसेच पोलिस अधीक्षक (सीआयडी क्राईम) धर्मेंद्र शर्मा यांनी सांगितले की, कोकरे भारतात परतला असून सध्या मुंबईत राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुजरात सीआयडीने मुंबई पोलिसांच्या मदतीने त्याला कुलाबा परिसरातून अटक केले.
पोलिस अधीक्षक (सीआयडी क्राईम) धर्मेंद्र शर्मा यांनी सांगितले की, सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका व्यावसायिकाला (अहमदाबादमधील) व्यक्तीचा फोन आला त्याने मी कुरिअर कंपनीचा एक्झिक्युटिव्ह असल्याचा दावा केला होता. तसेच पीडितेला सांगितले की बुक केलेले पार्सल पोलिसांनी जप्त केले असून, त्यात ड्रग्ज आणि पासपोर्ट सापडले आहेत.शर्मा यांनी सांगितले की, कॉलरने बनावट कॉल करून पीडितेला मुंबई सायबर क्राईमशी बोलण्यास सांगितले. त्यानंतर कॉलरने अहमदाबादच्या रहिवाशांना पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मुंबई सायबर क्राईम अधिकाऱ्यांशी (Mumbai Cyber ​​Crime Officer) बोलण्यास सांगितले. नंतर कॉलरने दुसऱ्या व्यक्तीशी व्हिडिओ कॉल कनेक्ट केला ज्याने स्वतःची ओळख मुंबई गुन्हे शाखेचे डीसीपी मिलिंद बरमाडे म्हणून दिली.

(हेही वाचा – Swatantrya Veer Savarkar यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या; लखनऊ न्यायालयात हजर होण्याचे आदेश)

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने पोलिसांकडे संपर्क साधला, असे पोलिस अधीक्षक धर्मेंद्र शर्मा यांनी सांगितले. तपासणी दरम्यान, तांत्रिक माहिती मिळवत सीआयडीने कॉलरची माहिती मिळवली. कॉलरने स्वतःची ओळख कुरिअर फर्मचा अधिकारी म्हणून सांगितली असून संबंधित आरोपी कोकरे हा मुंबईचा रहिवासी असून त्याला करण्यात आली.  

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.