जीएसटी महिला अधिकारी यांना Digital Arrest, २५ लाख रुपये उकळले

64
जीएसटी महिला अधिकारी यांना Digital Arrest, २५ लाख रुपये उकळले
जीएसटी महिला अधिकारी यांना Digital Arrest, २५ लाख रुपये उकळले

एका ५७ वर्षीय जीएसटी महिला अधिकारी डिजिटल अटकेला (Digital Arrest) बळी पडल्या आहेत, त्यांचा मोबाईल क्रमांक गुन्हेगारी कृत्यासाठी वापरला गेल्याचे तसेच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आल्याचे सांगून त्यांना डिजिटल अटकच्या (Digital Arrest) नावाखाली २५ लाख उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेल (Maharashtra Cyber ​​Cell) विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Rohit Sharma चा मुंबईत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सराव सुरू)

तक्रारदार जीएसटी अधिकारी या मूळच्या जळगाव जिल्ह्यात राहणाऱ्या असून जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) विभागात अधिकारी या पदावर काम करतात, १३ डिसेंबर रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना कॉल आला होता, दूरसंचार विभागातुन बोलत असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना कळवले की त्यांचा मोबाईल नंबर गुन्हेगारी कृत्यांसाठी वापरला जातो आणि मुंबईत तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस गणवेशातील व्यक्तीने तक्रारदाराला व्हिडीओ कॉल करून त्याने तक्रारदार यांची मालमत्ता, गुंतवणूक, रोख रक्कम, दागिने आणि बँक बॅलन्सची चौकशी केली. कॉलरने पीडितेला असेही सांगितले की तिच्या नावाने मुंबईत बँक खाते उघडण्यात आले होते, ज्याचा वापर २ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या व्यवहारासाठी करण्यात आला होता.

(हेही वाचा – केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाज उपयोगी ठरावे – CM Devendra Fadnavis)

१६ डिसेंबर रोजी, पीडितेला सांगण्यात आले की, जर तिने त्यांना पैसे हस्तांतरित केले नाही तर तिला अटक केली जाईल आणि सेंट्रल ब्युरो ऑफ इंडिया आणि सर्वोच्च न्यायालयाकडून बनावट आदेश दिले जातील. त्यानुसार, घाबरलेल्या तक्रारदाराने तिचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड विकले आणि कॉलरच्या सूचनेनुसार पैसे हस्तांतरित केले ज्याने ती कोणत्याही गुन्हेगारी कृतीत गुंतलेली नसताना तिचे पैसे परत मिळतील असे आश्वासन दिले. पीडित अधिकारी महिलेने त्यांची जमापुंजी तसेच एफडी मोडून २५ लाख रुपये एका बँक खात्यावर पाठवले, त्यानंतर पैशाची मागणी सुरूच राहिल्याने पीडित महिलेला संशय आल्याने त्यांनी तात्काळ महाराष्ट्र सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. महाराष्ट्र सायबर सेल (Maharashtra Cyber ​​Cell) कडून तात्काळ गुन्हा दाखल करून पीडितेकडून ज्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर केले ते खाते गोठवले असून सायबर फसवणूक करणाऱ्याचा माग घेतला जात असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर सेल (Maharashtra Cyber ​​Cell) अधिकारी यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.