‘कोयता गँग’ विरोधात पुणे पोलिस सक्रिय; विशेष पथक नेमले

163

पुण्यात सध्या कोयत्या गँगची दहशत आहे. सर्वसामान्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोयत्या गँगचा बिमोड करण्याचे पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. अशा वेळी पुणे पोलिस आता या गँगच्या विरोधात सक्रिय झाले आहे. त्यांनी विशेष पथक नेमले आहे. 

काय म्हणले पोलिस महासंचालक? 

हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अशा घटना घडू नये यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली. पुण्यातील एसआरपीएफ,ग्रुप, रामटेकडी येथे ३३ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी त्यांनी याबाबत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गॅंगकडून दहशत माजवल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील कोयता गँग विरोधात पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली असली. तरी अद्याप ही हातात कोयते नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच काम काही जण करत असल्याचे समोर आले आहे. 

(हेही वाचा शिवसेनेचा कारभार पक्षाच्या घटनेनुसारच चालतो का; ठाकरे गटाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.