Disability Quota : पूजा खेडकर प्रकरणानंतर महिला अधिकाऱ्याचा अपंग कोट्यावरच आक्षेप; म्हणाल्या …

155
Disability Quota : पूजा खेडकर प्रकरणानंतर महिला अधिकाऱ्याचा अपंग कोट्यावरच आक्षेप; म्हणाल्या …
Disability Quota : पूजा खेडकर प्रकरणानंतर महिला अधिकाऱ्याचा अपंग कोट्यावरच आक्षेप; म्हणाल्या …

अपंगत्वाचं (Disability Quota) प्रमाणपत्र सादर करून नागरी सेवेत अधिकारी झालेल्या प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचं प्रकरण समोर आल्यानंतर एका वरिष्ठ महिला अधिकाराने अपंगांच्या कोट्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी एक्स पोस्टद्वारे यावर या कोट्यावर आक्षेप घेतला आहे.

तेलंगणाच्या वित्त आयोगाच्या सदस्य सचिव स्मिता सभरवाल (Smita Sabharwal) पोस्टमध्ये म्हणाल्या की, “दिव्यांग व्यक्तींचा मी आदर करते. पण एखादी एअरलाइन अपंगत्व असलेल्या पायलटला कामावर ठेवते का? किंवा तुम्ही अपंग असलेल्या सर्जनवर विश्वास ठेवाल का? AIS (IAS/IPS/IFoS) चे स्वरूप फील्ड-वर्कचे आहे. दीर्घकाळ काम करावं लागतं. लोकांच्या तक्रारी ऐकून घ्याव्या लागतात. यासाठी फिटनेस अत्यावश्यक आहे. त्यामुळे या सेवेत प्राथमिदृष्ट्या कोट्याची आवश्यकता आहे का?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. (Disability Quota)

त्यांच्या पोस्टनंतर वाद सुरू झाला आहे. ठाकरे गट राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या दृष्टीकोनाला दयनीय असं म्हटलंय. त्या म्हणाल्या, “हा एक दयनीय आणि बहिष्कृत दृष्टिकोन आहे. नोकरशहा त्यांचे मर्यादित विचार आणि त्यांचे विशेषाधिकार असे दाखवतात हे पाहणे हास्यास्पद आहे. प्रियांका चतुर्वेदी यांच्या या पोस्टवर स्मिता सभरवाल यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत म्हटलं की, “मॅडम, जर नोकरशहा प्रशासनाच्या समर्पक मुद्द्यांवर बोलू शकत नाहीत, तर कोण बोलणार? माझे विचार आणि चिंता २४ वर्षांच्या कारकि‍र्दीच्या अनुभवातून आलेली आहे, हे विचार मर्यादित नाहीत. मी काय म्हटलंय हे काळजीपूर्वक वाचा. मी म्हटलंय की, इतर केंद्रीय सेवांच्या तुलनेत AISचे निकष वेगळे असतात. प्रतिभावान भिन्न-अपंग व्यक्तींना नोकरीची उत्तम संधी मिळू शकते.” (Disability Quota)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.