ड्रगमाफिया ललित पाटील (Lalit Patil) याला ससुन रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपाबाबत पुणे पोलीस दलातील दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. या दोघांवर बडतर्फीचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी काढले आहेत.
नाथा काळे आणि अमित जाधव अशी या दोघांची नावे असून ते त्यांना अटक करण्यात आली आहे. ड्रगमाफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून १ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. तेव्हा नाथा काळे आणि अमित जाधव हे दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या १६ नंबर वॉर्डबाहेर पहारा देत होते. कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांच्या बडतर्फीचे आदेश काढण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Crime : तंबू बांधून राहणाऱ्या टोळीला अटक )
याशिवाय या प्रकरणात दोषी आढळलेले ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करून त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते यांचं निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी समितीला दोषी आढळलेल्या या दोन्ही डॉक्टरांवर पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community