बिवली एमआयडीसी येथे केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात (Dombivli Blast) मृत झालेल्याची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. डीएनए चाचणी नंतरच मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कादबाने यांनी दिली.
मृतदेहाची ओळख पटवणे अवघड
डोंबिवली पूर्व एमआयडीसी फेस २ येथे गुरुवारी दुपारी अमुदान केमिकल कंपनीत केमिकल रिऍक्टरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या स्फोटाची तीव्रता (Dombivli Blast) एवढी भीषण होती की, अनेकांचे मृतदेहाचे तुकडे होऊन १०० मीटरमध्ये उडाले, तर स्फोटानंतर (Dombivli Blast) लागलेल्या आगीत जळाल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले आहे. घटनेच्या ठिकाणी ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले हे मृतदेह शास्त्री नगर रुगणाल्यात पाठविण्यात आले आहे.
रुग्णालयात आणण्यात आलेले अनेक मृतदेहाचे अवयव वेगळे झालेले असून इतर मृतदेह पूर्णपणे जळाले आहे. ११ मृतदेहा पैकी २ महिलांच्या मृतदेहाची ओळख पटवून कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरित मृतदेह ओळखू येत नाही. अमुदान केमिकल कंपनीत काम करणारे तसेच आजूबाजूच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांपैकी १० नातेवाईकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे, या नातेवाईकपैकी अनेकांचे डीएनएचे नमुने घेण्यात आले असून हे नमुने मृतदेहाच्या डीएनएशी जुळविण्यात येणार आहे, त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कादबाने यांनी दिली.
Join Our WhatsApp Community