मुंबईकरांनो सावध रहा! कागदपत्रांचा वापर होतोय गुन्हेगारी कृत्यासाठी, कसा ते वाचा

206
मुंबईकरांनो सावध रहा! कागदपत्रांचा वापर होतोय गुन्हेगारी कृत्यासाठी, कसा ते वाचा
मुंबईकरांनो सावध रहा! कागदपत्रांचा वापर होतोय गुन्हेगारी कृत्यासाठी, कसा ते वाचा

मुंबईकरांच्या महत्वाच्या कागदपत्रांचा वापर मोबाईल फोनचे सिम कार्ड खरेदीसाठी करण्यात येत आहे, हे सिम कार्ड परराज्यात गुन्हेगारी कृत्यासाठी वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बोरिवली येथील एका मोबाईल फोन दुकानातील कर्मचाऱ्याला पोलिसांनी नुकतीच अटक केली असून त्याच्या मार्फत विक्री करण्यात आलेले सिम कार्ड उत्तर प्रदेशात गुन्हेगारी कृत्यासाठी वापरण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी अटक आरोपींसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचा – मुंबई मनपा रुग्णालयातील मोफत साहित्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एकाला अटक)

उत्तर प्रदेश पोलिसांनी काही आठवड्यापूर्वी जौनपूरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून १२८ मोबाईल सिम कार्डसह अनेकांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान बोगस कॉल सेंटरमध्ये वापरण्यात येणारी १२८ सिमकार्ड मुंबईतून विकल्याचे निष्पन्न झाले होते, याप्रकरणी दूरसंचार विभागाला माहिती देण्यात आली होती. एका बड्या टेलिकॉम कंपनीच्या नोडल ऑफिसरने दिलेल्या तक्रारीच्या आधारे बोरिवलीतील एमएचबी कॉलनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून बोरिवलीतील एका मोबाईल फोन दुकानातील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली, त्याच्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे.

दुकानात सिम कार्ड खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या कागदपत्रांचा वापर दुसरे सिम खरेदी करण्यासाठी केला जात होता. ग्राहकाच्या कागदपत्रांचा आधारे खरेदी केलेले सिम कार्ड उत्तर प्रदेशात येथील बोगस कॉल सेंटरमध्ये विकले जात होते. यामागे एक टोळी काम करीत होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या दुकानातून ९९ सिम कार्ड उत्तर प्रदेशात विकले गेले होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी अटक आरोपीसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.