Doda Terrorist Attack: डोडामधील अतिरेकी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधात चार शोधपथके, हेलिकॉप्टर, ड्रोन शोधमोहिमेवर

121
Doda Terrorist Attack: डोडामधील अतिरेकी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधात चार शोधपथके, हेलिकॉप्टर, ड्रोन शोधमोहिमेवर
Doda Terrorist Attack: डोडामधील अतिरेकी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधात चार शोधपथके, हेलिकॉप्टर, ड्रोन शोधमोहिमेवर

अतिरेक्यांच्या हल्ल्यात सोमवारी, एका जेसीओसह ५ जवान हुतात्मा (Doda Terrorist Attack) झाले होते. इतर ५ जण जखमी आहेत. लष्कराच्या सूत्रांनुसार, हा हल्ला पाकिस्तानातून आलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांनी घडवून आणला होता. एका स्थानिक गाइडने त्यांची मदत केली. यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, आम्ही अतिरेक्यांचा बदला घेऊ. जम्मू विभागात एक महिन्यातील हा पाचवा अतिरेकी हल्ला आहे. दरम्यान, पॅरा कमांडोज, हेलिकॉप्टर, ड्रोन आणि स्निफर डॉग्जच्या मदतीने लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची चार पथके शोध घेत आहेत. (Doda Terrorist Attack)

(हेही वाचा –Earthquake Marathwada : मराठवाडा, विदर्भात भूकंपाचे धक्के; परभणी, हिंगोली, नांदेडसह वाशीममध्ये भीतीचे वातावरण)

जूनमध्ये सुरक्षा दलांना कठुआतील बानी, डग्गर, किंडलीच्या पर्वतीय भागात एका गटाच्या संशयित हालचालींची माहिती मिळाली होती. शोधमोहिमेत ६ पाकिस्तानी अतिरेकी असल्याचे कळाले. नंतर ते प्रत्येकी तीन गटात विभागले. त्यापैकी तीन अलीकडेच डोडामध्ये मारले गेले. कठुआमध्ये हल्ला करणारा दुसरा गट असू शकतो. जम्मूत सर्व परदेशी अतिरेकी ऑपरेट करत आहेत. त्यांना स्थानिक लोकांचा सपोर्ट आहे. हाच सपोर्ट तोडणे आता गरजेचे झाले आहे. काश्मीर टायगर्स नावाच्या अतिरेकी संघटनेच्या मदतीने पाकिस्तान हल्ले करत आहे. (Doda Terrorist Attack)

लष्कराचे वाहन ज्या रस्त्यावर होते तिथे गाडी वेगाने धावू शकत नाही, हे अतिरेक्यांना माहीत होते. १० ते २० च्या वेगानेच येथून जावे लागते. रस्त्याच्या वर डोंगर आहे. तेथून सहजपणे वाहनावर निशाणा साधत पळून जाता येणे शक्य आहे. त्यांनीच कठुआ हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ते जैश-ए-मोहंमदशी कनेक्ट आहेत. याच गटाने २८ एप्रिलला बसनगडमध्ये हल्ला करून स्थानिक विलेज डिफेंस गार्ड मोहंमद शरीफची हत्या केली होती. जवान डोडातील गढी भगवाहच्या जंगलात शोध घेत होते तेव्हा अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. (Doda Terrorist Attack)

(हेही वाचा –Nagpur Accident : हिट अँड रनच्या घटनांनी नागपूर हादरलं! ४८ तासांत ६ जणांनी गमावले प्राण)

कठुआमध्ये हुतात्मा झालेले गढवाल रायफल्सचे पाचही जवान उत्तराखंडचे आहेत. डेहराडूनच्या अठुरवालाचा राहणारा नायक विनोद भंडारी याच्या घरी हुतात्मा झाल्याचे वृत्त येताच गोंधळ उडाला. विनोदला ३ महिन्यांची मुलगी व चार वर्षांचा मुलगा आहे. तथापि, २ निष्पाप मुलांना पाहून वीरसिंह यांना अश्रू आवरता आले नाही. २६ वर्षांचा हुतात्मा आदर्श नेगी टिहरी जिल्ह्यातील थाती डागर गावचा आहे. त्याचे वडील दलबीर म्हणाले, मुलास नवरदेव करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. दोन महिन्यांपूर्वी आदर्शच्या मामाचा मुलगा हुतात्मा झाला होता. आमच्या कुटुंबाने दोन महिन्यांत दोन जवान गमावले. तिकडे शहीद अनुज नेगीच्या मृत्यूचे वृत्त कळताच त्याची आई आणि पत्नी बेशुद्ध आहे. हुतात्मा कमलला आई, पत्नी आणि दोन मुली आहेत. (Doda Terrorist Attack)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.