Dombivli MIDC Blast : सोन्याच्या अंगठीमुळे डोंबिवली स्फोटातील मृत महिलेची ओळख पटली 

545
Dombivli MIDC Blast : सोन्याच्या अंगठीमुळे डोंबिवली स्फोटातील मृत महिलेची ओळख पटली 
Dombivli MIDC Blast : सोन्याच्या अंगठीमुळे डोंबिवली स्फोटातील मृत महिलेची ओळख पटली 
  • डोंबिवली- संतोष वाघ
पालघर येथील पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करणारे आणि मानपाडा येथील रहिवासी असलेले अमित खानविलकर (Amit Khanwilkar) (४२) सुट्टीमुळे घरीच होते. गुरूवारी दुपारी एमआयडीसीच्या बाजूने मोठा स्फोट झाला आणि त्यांची पत्नी रिद्धी अमित खानविलकर (Riddhi Amit Khanwilkar) (३८) या कंपनीत काम करत असल्याने ते घाबरले. त्यानी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु फोन लागला नाही, नंतर त्याच्या मित्रांना माहिती दिली. (Dombivli MIDC Blast)
तोपर्यंत अमुदान केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड (AMUDAN CHEMICALS PRIVATE LIMITED) या कंपनीत झालेल्या स्फोटाची बातमी पसरली होती आणि खानविलकरच्या मित्रांनी तिचे फोटो व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये प्रसारित केले, त्याच बरोबर  स्थानिक रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या याबाबत माहिती दिली. काही तासांनंतर, खानविलकर यांचे कौटुंबिक मित्र अमित म्हाबदी यांना एका डॉक्टरचा फोन आला त्यानी सांगितले की, ज्या दोन हॉस्पिटलमध्ये पीडितांचे मृतदेह नेण्यात आले होते तेथे माहिती घ्या. दोन महिलांसह चार मृतदेह डोंबिवली (पश्चिम) येथील शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.म्हाबदी हे मित्रांसोबत रुग्णालयात पोहोचले,मात्र त्या ठिकाणी असलेले दोन्ही  महिलांचे मृतदेह ओळखण्या पलीकडे संपूर्ण जळालेल्या अवस्थेत होते.म्हाब्दी यांनी मित्र खानविलकर यांना रुग्णालयात येण्यास सांगितले. (Dombivli MIDC Blast)
“मी  डोंबिवली पश्चिमेला असलेल्या शास्त्री नगर  रुग्णालयात, दोन महिलांचे मृतदेह मला दाखविण्यात आले, परंतु दोन्ही मृतदेह पूर्णपणे जळालेले होते,माझी पत्नी  रिद्धीचा मृतदेह मी  तिच्या सोन्याच्या अंगठीवरून ओळखला असे अमित खानविलकर यांनी सांगितले.“आम्हाला १२ वर्षांचा मुलगा असल्याने रिद्धीला घरापासून फार दूर काम करायचे नव्हते. ती या (अमुदान) कंपनीत फक्त तीन महिन्यांपूर्वी अकाउंट्स विभागात रुजू झाली आणि या दुर्दैवी घटनेने आमचे आयुष्य उद्ध्वस्त केले,” असे शोकाकुल खानविलकर म्हणाले. त्यांचा मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याच्या मामाच्या घरी होता, आणि या घटनेबाबत त्याला अद्याप कळवले नाही असे खानविलकर यांनी सांगितले. (Dombivli MIDC Blast)
या स्फोटात लागलेल्या आगीत रिद्धीची सहकारी रोहिणी कदम (Rohini Kadam)(२३) हिचा देखील मृत्यू झाला आहे. डोंबिवली (पूर्व) येथील आजदे गाव परिसरात रोहिणी मोठा भाऊ आणि आई-वडिलांसोबत राहत होती.रोहिणीचा भाऊ रोहित कदम, कामानिमित्त मुंबईत होता , त्याचे मित्र, शेजारी आणि नातेवाईक, रोहिणीला रुग्णालयात शोधण्याचा प्रयत्न करत होते.रोहितचा जवळचा मित्र प्रतीक खैरे म्हणाला, “बऱ्याच प्रयत्नांनंतर, आम्हाला कळले की रोहिणीचा मृत्यू झाला होता आणि तिचा मृतदेह शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आला होता. (Dombivli MIDC Blast)
आपली बहीण गमावल्यामुळे संतापलेल्या रोहितने  “या घटनेला कोण जबाबदार आहे किंवा प्रशासन बद्दल मला काहीही बोलायचे नाही.” असे रोहित म्हणाला. (Dombivli MIDC Blast)
शास्त्री नगर रुग्णालयाच्या पंचनामा कक्षात तैनात असलेल्या एका पोलीस हवालदाराने सांगितले की, मृतदेह रुग्णालयात आणले तेव्हा ते छिन्न विच्छिन्न अवस्थेत होते, पूर्णपणे काळेठिक्कर पडले होते, मृतदेह बघून कुटुंबीय अस्वस्थ झाले. (Dombivli MIDC Blast)
‘माझा भाऊ बेपत्ता आहे’……
स्फोट झाला त्या ठिकाणाहून  किमान आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि ६४  जखमींना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले, तर काही जण बेपत्ता आहेत. अमुदान कंपनी शेजारीच असलेली सप्तवर्ण कलरंट्स प्रायव्हेट लिमिटेड या फॅब्रिक डाई बनवणाऱ्या कंपनीत काम करणारा राकेश राजपूत आठ तासांच्या बचावकार्यानंतरही बेपत्ता होता.राकेशचा धाकटा भाऊ विवेक कुमार राजपूत हा अपघातस्थळी त्याच्या मोबाईलवर भावाचा फोटो घेऊन त्याला शोधत होता. ही भावंडं मूळची उत्तराखंड प्रदेशातील कन्नौज गावची आहेत. राकेश ज्या कंपनीत काम करायचे ती कंपनी अमुगन कंपनीच्या शेजारी होती. (Dombivli MIDC Blast)
“माझा भाऊ १२ वर्षांपासून सप्तवर्ण कंपनीत काम करत आहे. त्याला पत्नी, पाच मुली आणि एका मुलासह डोंबिवली (पूर्व) येथील सोनारपाडा येथे राहत होते. फायर ब्रिगेडच्या जवानांनी मला सांगितले की कूलिंग ऑपरेशन चालू आहे आणि माझ्या भावाचा ठावठिकाणा लवकरच कळेल,” असे विवेक म्हणाला. (Dombivli MIDC Blast)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.