अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीवर गोळ्या (Donald Trump shooting) झाडण्यात आल्या आहेत. त्यात ते जखमी झाले आहेत. त्यांच्या उजव्या कानाला गोळी लागली. त्यानंतर उजव्या कानातून रक्त येऊ लागले आणि चेहऱ्यावरही रक्ताच्या खुणा दिसत होत्या. ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये रॅली घेत असताना अचानक एका व्यक्तीने गोळीबार सुरू केला. या गोळीबारातून ट्रम्प थोडक्यात बचावले आणि गोळी त्यांच्या उजव्या कानाला लागली.
#WATCH | Gunfire at Donald Trump’s rally in Butler, Pennsylvania (USA). He was escorted to a vehicle by the US Secret Service
“The former President is safe and further information will be released when available’ says the US Secret Service.
(Source – Reuters) pic.twitter.com/289Z7ZzxpX
— ANI (@ANI) July 13, 2024
ही गोळी 2 सेंटीमीटरनेही आत गेली असती तर ट्रम्प यांना आपला जीव गमवावा लागला असता. या संदर्भातील व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान संशयित बंदूकधारीला ठार करण्यात आले आहे. तसेच रॅलीत सहभागी झालेल्या एकाचा मृत्यू झाला आहे. आणखी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अजून गोळीबार करणाऱ्याची ओळख पटलेली नाही. (Donald Trump shooting)
घटनेवर ट्रम्प यांची प्रतिक्रिया काय?
डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घटनेवर म्हटले आहे की, “अमेरिकेत असे काही घडू शकते यावर विश्वास बसत नाही. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीबद्दल मला कोणतीही माहिती नाही, जो आता मरण पावला आहे. माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागली होती. मला लगेच कळले. काहीतरी गडबड होते कारण मला मोठा आवाज ऐकू आला, गोळ्या झाडल्या गेल्या आणि लगेच रक्तही आले.” (Donald Trump shooting)
नेमकं काय घडलं?
पहिला गोळी झाडताच ट्रम्प म्हणाले, ‘अरे’ आणि आणखी दोन गोळ्यांचा आवाज आला. यानंतर ट्रम्प खाली वाकले. हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “त्यांच्या कानातून गोळी गेल्यासारखे वाटले.” हल्ल्यानंतर ट्रम्प काही वेळातच उठले. ते त्यांचा उजवा हात चेहऱ्याकडे वर करताना दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर रक्त होते. व्हाईट हाऊसने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. युनायटेड स्टेट्स सेक्रेटरी सर्व्हिसेस डायरेक्टर किम्बर्ली चीटल, होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी अलेजांद्रो मेयोर्कस आणि व्हाईट हाऊस होमलँड सुरक्षा सल्लागार लिझ शेरवुड-रँडल यांच्याकडून त्यांना घटनेची माहिती दिली गेली. (Donald Trump shooting)
ट्रम्प सुरक्षित…
सीक्रेट सर्व्हिसकडून या घटनेवर सांगण्यात आले की, ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. ट्रम्प मंचावरून खाली आल्यानंतर लगेचच पोलिसांनी रॅलीचे मैदान रिकामे केले. सीक्रेट सर्व्हिसने या हल्ल्याचा तपास सुरु केला आहे. दरम्यान, एफबीआयची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. या प्रकरणाच्या तपासात ही टीम सीक्रेट सर्व्हिससोबत काम करेल, असे एजन्सीने म्हटले आहे. (Donald Trump shooting)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community