Donald Trump यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा फोटो समोर!

259
Donald Trump यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा फोटो समोर!
Donald Trump यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा फोटो समोर!

अमेरिकेचे माजी अध्यक्ष व अमेरिकेच्या यंदाच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर शनिवारी (१३ जुलै) पेन्सल्व्हेनिया येथे निवडणूक प्रचाराच्या एका कार्यक्रमाला संबोधित करत असताना अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. प्रचारसभेत बोलत असताना बंदुकीतून गोळी सुटल्याचा आवाज आला. ही गोळी ट्रम्प यांच्या कानला चाटून गेली अन् ते खाली कोसळले. तसेच लोकांमध्ये गोंधळ उडाला. मात्र ट्रम्प यांच्या अंगरक्षकांनी लगेच त्यांना घेराव घातला आणि त्यांना व्यासपीठाच्या मागे घेऊन गेले. त्यावेळी ट्रम्प यांच्या कानावरून रक्त ओघळत असल्याचं दिसत होतं.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये शूटरने गोळी कुठून मारली तो व्हिडीओ समोर आला आहे. यूएस सीक्रेट सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, शनिवारी ट्रम्प यांच्यावर उघडपणे हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. ज्यामध्ये रॅलीच्या बाहेर एका उंच ठिकाणाहून स्टेजच्या दिशेने अनेक गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. BNO न्यूजने एक व्हिडीओ शेअर केलाय. शूटरने ट्रंपवर कोठून हल्ला केला हे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. ट्रम्पच्या रॅलीत हल्लेखोराने जवळच्या इमारतीच्या छतावरून गोळीबार केल्याच दिसतंय.(Donald Trump)

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हल्लेखोर जवळच्या इमारतीच्या छतावर दिसतोय. गोळ्या झाडल्यामुळे रॅलीत चेंगराचेंगरी झाली होती. सीएनएनने सीक्रेट सर्व्हिसच्या सूत्राचा हवाला देत सांगितले की, शनिवारी ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोराची ओळख 20 वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रूक्स अशी झाली आहे, असे सूत्रांनी न्यूयॉर्क पोस्टला सांगितले.पेनसिल्व्हेनियाच्या बेथेल पार्कच्या थॉमसने पिट्सबर्गच्या अगदी बाहेर बटलरमध्ये बाहेरच्या रॅलीत गोळीबार केला. सूत्रांनी सांगितले की, थॉमसला बटलर फार्म शोग्राऊंडच्या स्टेजपासून 130 यार्डांपेक्षा जास्त अंतरावर एका मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या छतावर दिसले.(Donald Trump)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.