महसूल गुप्तचर संचालनालयाने विदेशातून तस्करीच्या सोन्याची वाहतूक करणाऱ्यांवर मुंबईत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ८.५ कोटी रुपयांचं १३.७ किलो सोनं जप्त केलं आहे. डीआरआयने मुंबई,पुणे आणि वाराणसी या तीन ठिकाणी ही कारवाई केली आहे.(Gold smuggling In Mumbai)
डीआरआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये डीआरआयने कारवाई करून ११ जणांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्या ताब्यातून ३१ किलो ७०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले होते. त्याची किंमत १९ कोटी रुपये होती. पुढे याच चौकशीतून डीआरआय मुंबईच्या पथकाने पुण्याजवळ बसमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांवर अटकेची कारवाई केली.
(हेही वाचा : Freedom Fighter Annapurna Maharana : इंग्रजांना आव्हान देणारी महिला स्वातंत्र्यसैनिक अन्नपूर्णा महाराणा)
३० ऑक्टोबरला त्यांच्या ताब्यातून पाच किलो सोने जप्त करण्यात आले. १३ किलो ७०० ग्रॅम सांगली जिल्ह्यातील एका आरोपीचा सहभाग समोर येताच, ३१ ऑक्टोबरला आरोपीच्या घरी छापा मारण्यात आला. त्यात वाराणसीहून नागपूरला दोघेजण सोने घेऊन येणार असल्याचे डीआरआयच्या अधिकाऱ्यांना समजले. त्यानुसार, वाराणसी येथील डीआरआयच्या स्थानिक पथकाच्या मदतीने कारवाई करून आठ किलो ७०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. याप्रकरणी सोने नागपूरला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत १३ किलो ७०० ग्रॅम तिघांना मुंबईतून तर दोघांना वाराणसीतून डीआरआयने अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
हेही पहा –