राज्यातील नाशिक, सोलापूर नंतर संभाजी नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. अहमदाबाद गुन्हे शाखा आणि महसूल गुप्तचर संचालना लयाच्या (DRI) अहमदाबाद युनिटने शुक्रवारी राज्यातील संभाजी नगर जिल्ह्यात (औरंगाबाद) २५० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले.
अहमदाबाद गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्या कडून दुसऱ्या एका अमली पदार्थ प्रकरणाचा तपास करत असताना संभाजी नगर येथील एका कारखान्यात अमली पदार्थ बनवले जात असल्याची माहिती मिळाल्या नंतर केंद्रीय तपास यंत्रणा डीआयआर कडून (DRI) कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीवरून अहमदाबाद गुन्हे शाखा आणि डीआरआयच्या संयुक्त पथकाने संभाजी नगर औद्योगिक परिसरात असलेल्या महालक्ष्मी इंडस्ट्रीज नावाच्या कारखान्यावर छापा टाकून ४.५ किलो मेफेड्रोन, ४.३ किलो केटामाइन आणि ९.३ किलो वजनाचे मेफेड्रोनचे आणखी एक मिश्रण जप्त केले. या छाप्यात मुख्य सूत्रधारासह दोन जणांना अमली पदार्थ प्रतिबंध कायदा अंतर्गत (NDPS ) गुन्हा दाखल करून , अटक केली.
एका आरोपीच्या राहत्या ठिकाणची झडती घेतली असता सुमारे २३किलो कोकेन, तसेच २.९ किलो मेफेड्रोन आणि भारतीय चलनात ३० लाख रुपये जप्त करण्यात आले. डीआयआरने जप्त केलेल्या औषधांची बाजारातील किंमत २५०कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Join Our WhatsApp Community