डीआरआय अर्थात गुप्तचर महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथील दोन छुप्या मेफेड्रोन निर्मिती केंद्रांवर धाडी टाकून तेथील अंमली पदार्थविषयक जाळे उध्वस्त केले आणि ही केंद्रे चालवणारा आणि त्यासाठी पैसा पुरवणा-याला म्होरक्याला ताब्यात घेतले आहे.
या धाडीत डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी काळ्या बाजारात 49 लाख 77 हजार कोटी रुपयांची किंमत असणारे, वापरास तयार स्वरूपातील 24.885 किलो मेफेड्रोन, तसेच याच्या निर्मिती प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य, मेफेड्रोन विक्रीतून मिळालेले 18 लाख 90 हजार रुपये, महत्त्वाचा कच्चा माल, यंत्रे आणि तस्करीसाठी वापरण्यात येणारी वाहने जप्त केली.
( हेही वाचा: मुंबईत हत्यांच्या गुन्ह्यात घट; मात्र इतर गुन्ह्यांत वाढ )
गृह मंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या सूचनेनुसार कारवाई
विशिष्ट गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी वेगवान तसेच उत्तम प्रकारच्या समन्वयासह 21 डिसेंबर 2022 रोजी ही मोहीम राबवली आणि अंमली पदार्थ निर्मिती करणारी दोन केंद्रे उध्वस्त केली. या दोन्ही ठिकाणी काम करत असलेल्या सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर तत्काळ केलेल्या पाठपुराव्यातून, ही केंद्रे चालवणारा आणि त्यासाठी पैसा पुरवणारा मुख्य आरोपी 60 लाख रुपयांच्या रोख रकमेसह नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच गोरखपूर येथून ताब्यात घेण्यात आला. अंमली पदार्थ तस्करीविषयक प्रकरणांमधील मुख्य सूत्रधार आणि कारस्थानी तसेच यासाठी पैसा पुरवणारे यांना पकडण्यावर जोर देत, केंद्रीय गृह मंत्री तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, ही समन्वयीत मोहीम पार पाडण्यात आली.
Join Our WhatsApp Community