‘कॅलिशियम नायट्रेट’च्या नावाखाली शासनाचा महसूल बुडवून होणारी सुपारीची तस्करी रोखण्यास महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) यश आले आहे. नवी मुंबईतील न्हावाशेवा बंदरातून डीआरआयने सुपारीचे १४ कंटेनर जप्त केले आहे. या सुपारीची बाजारात ३२ कोटी एवढी किंमत आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे सुपारीची चोरटी वाहतूक करण्यात येत असलेल्या ३२ कोटी रुपयांची सुपारी जप्त केली आहेत.
गुप्त माहितीच्या आधारावर, डीआरआयने तळेगावमधील इनलँड कंटेनर डेपोसाठी निघालेल्या १४ कंटेनर ३१ ऑगस्ट रोजी जवाहरलाल नेहरू बंदरात सुपारी असल्याच्या संशयावरून अडवले होते. जेएनपीटी बंदरात कंटेनरला ड्राय पोर्टवर पाठवण्याआधी ते थांबवण्यात आले. इम्पोर्ट मॅनिफेस्ट तपशील आणि बिल ऑफ लॅडिंगमध्ये केलेल्या तपशिलात कंटेनरमध्ये ‘कॅल्शियम नायट्रेट’ असल्याचे नमूद करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले.
जप्त करण्यात आलेल्या कंटेनरमध्ये शासनाचा महसूल बुडवून सुपारीची तस्करी करण्यात येत होती. ‘कॅल्शियम नायट्रेट’च्या नावाखाली भारतात सुपारीची तस्करी होत असल्याचे समोर आले. शासनाने बाहेरून देशात आणलेल्या सुपारीवर यूएसडी दरानुसार १०,३७९ प्रति मेट्रिक टन मूल्य ठेवले आहे. त्यामुळे ३,७१,०९० किलो (३७१ मेट्रिक टन) जप्त केलेली सुपारीची किंमत अंदाजे ३२.३१ कोटी रुपयांची आहे आणि ती जप्त करण्यात आली आहे.
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=M_BcFKFhGfk
Join Our WhatsApp Community