“माझा नवरा निर्दोष…”, Kurla Bus Accident प्रकरणी चालकाच्या पत्नीची प्रतिक्रिया

415
Best Undertaking : बेस्ट समितीने नाकारलेल्या संस्थेचा प्रस्ताव प्रशासनाने केला मंजूर; रवी राजा यांचा ओला कंपनीबाबत गंभीर आरोप

कुर्ला पश्चिमेतील (Kurla Bus Accident) एसजी बर्वे मार्गावरील अंजुमन इस्लाम हायस्कुल समोर सोमवारी (9 डिसेंबर) रात्री बेस्ट बसचे नियंत्रण सुटून भरधाव बसने पादचारी आणि वाहनांना चिरडत एका कमानीवर आदळली. या अपघातात सहा जण ठार तर ४९ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. कुर्ला (Kurla) ते अंधेरी या मार्ग क्रमांक ३३२ बसने वाहने आणि पादचाऱ्यांना चिरडत असताना कुर्ला पश्चिम एस.जी. बर्वे मार्गावर एकच गोंधळ निर्माण होऊन लोक रस्त्यावर सैरावैरा धावत होते. (Kurla Bus Accident)

हेही वाचा-Kurla Best Bus Accident : बेस्टमधील भाडे करार तत्त्वावरील बसेसचे पाप उबाठा सेनेचे

बेस्ट बस चालक संजय मोरे याला रात्री कुर्ला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आज त्याला कुर्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. बेस्ट बस साठी कुर्ला स्थानक (Kurla Station) मार्ग मंगळवारी बंद ठेवण्यात आला असून कुर्ला स्थानकातून सुटणाऱ्या बेस्ट बसेस कुर्ला आगार आणि चेंबूर सांताक्रूझ लिंक रोड येथून सोडण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. (Kurla Bus Accident)

हेही वाचा-Kurla Bus Accident प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा !

या प्रकरणावर संजय मोरेच्या (Sanjay More) पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे. “ड्युटीवर जाताना कुठलंही भांडण झालं नव्हतं. मी स्टॉलवर जाते, माझ्यासोबत तेही मेहनत करतात. बरोबर एक वाजता ड्युटीला निघतात, वेळ कधीही चुकवत नाहीत. माझा नवरा दारु अजिबात नाही घेणार, एवढी मला गॅरंटी आहे, एवढा विश्वास मला माझ्या नवऱ्यावर आहे. तो कोणाला त्रास नाही देणार, आमच्या पूर्ण एरियातही कोणाकडे वर मान करुन तो कधी बोललेला नाही.” असं संजय मोरे याच्या पत्नीने एका वाहिनीशी बोलताना सांगितले आहे. (Kurla Bus Accident)

हेही वाचा-Kurla Bus Accident : बसचे ब्रेक फेल नाहीत; कुर्ला अपघात प्रकरणी पोलिसांचा दावा

पुढे बोलताना पत्नी म्हणाली, “माझ्या लग्नाला २३ वर्ष झाली, पण त्याने कधीही गाडी ठोकली नाही. त्याने ज्या कंपनीत काम केलंय, तिथे त्याचे चांगले रेकॉर्ड आहेत. मोरे आहे म्हटल्यावर कोणी नाव नाही ठेवणार. माझा नवरा निर्दोष आहे, तो सुटणार, ही घटना झाली ती चुकून झाली आहे. त्याने कधी कोणाचं वाईट नाही केलं. माझ्या नवऱ्याचा काही दोष नाही, जर बसचा ब्रेकच फेल झाला असेल, गाड्या रिन्यू केल्या नसतील, त्याला माणूस काय करणार? ड्रायव्हरचं काम नाही सगळ्या गाड्या चेक करणं. माझा नवरा मला व्यवस्थित घरी पाहिजे, बाकी काही मागणी नाही. दोष गाडीचाच आहे, नवऱ्यात काही दोष नाही.” असं त्याची पत्नी म्हणाली. (Kurla Bus Accident)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.