Drug Crime Branch : ड्रग्जच्या व्यसनासाठी पोटच्या मुलांचा सौदा

गुन्हे शाखेकडून आंतरराज्यीय रॅकेट उध्वस्त

184
Drug Crime Branch : ड्रग्जच्या व्यसनासाठी पोटच्या मुलांचा सौदा

ड्रग्जच्या व्यसनापायी (Drug Crime Branch) पोटच्या दोन मुलांची विक्री करणाऱ्या एका माता पित्याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती. या दोघांच्या चौकशीत मुले खरेदी विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने मुंबईतील विविध भागातून या टोळीतील ६ जणांना अटक केली असून या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता ८ वर गेली आहे. या टोळीने मागील काही महिन्यांमध्ये मुंबई,पालघर,आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून ८ मुलांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अंधेरी पश्चिम येथील डी.एन. नगर पोलीस (Drug Crime Branch) ठाण्यात मागील आठवड्यात एका महिलेच्या मुलांची विक्री करण्यात आल्याची तक्रार दाखल केली होती. या मुलाची विक्री मुलाच्या आई वडिलांनीच केल्याचे तक्रारीत म्हटले होते. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष ९ कडे देण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन, सपोआ. महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ९ प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शना खाली कक्ष ९ च्या पथकांनी विक्री करण्यात आलेल्या मुलाच्या आई वडिलांना (Drug Crime Branch) ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.

(हेही वाचा – Rajasthan Assembly Election : अशोक गेहलोत, सचिन पायलट आणि वसुंधरा राजे शर्यतीत)

या दोघांनी पोटच्या (Drug Crime Branch) दोन वर्षांचा मुलगा आणि २ महिन्याच्या मुलीची ६० हजार आणि १४ हजार रुपयांमध्ये विक्री केली. या दोघांना अमली पदार्थाचे व्यसन होते व या व्यसणापायी त्यांनी मुलांची विक्री केल्याची कबुली या दोघांनी पोलिसांना दिली.

दरम्यान पोलिसांकडून तात्काळ मुले खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन शब्बीर समशेर खान (२८), सानिया शब्बीर खान (२६), शकिल मुल्लाबक्ष मकरानी (४८) यांना प्रथम अटक करण्यात आली. शब्बीर आणि सानिया हे पती पत्नी असून दोघे वांद्रे पूर्व भारत नगर येथे राहणारे असून त्यांनी अंधेरी पश्चिम येथे राहणाऱ्या मकरानी याच्या मदतीने मुलांची विक्री केल्याचे समोर आले.

गुन्हे शाखेच्या पुढील तपासात गुन्हे शाखेने (Drug Crime Branch) उषा अनिल राठोड (४२),मणिकम्मा नरसप्पा भंडारी उर्फ अम्मा (६३),वैशाली फगारिया उर्फ वैशाली राजेश जैन (४५), शफीक हरून शेख उर्फ साहिल (४५), बाळकृष्ण कांबळे (३३) या टोळीला मुंबईतील पश्चिम उपनगरातून विविध परिसरातून अटक करण्यात आली आहे. ही टोळी लहान मुलांची खरेदी विक्रीच्या रॅकेट मध्ये सामील असून या टोळीने मुंबई ,पालघर, आंध्रप्रदेश आणी तामिळनाडू येथे आठ मुलांची विक्री केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. (Drug Crime Branch)

(हेही वाचा – Supreme Court: राज्यपालांना विधेयके प्रलंबित ठेवण्याचे स्वातंत्र्य नाही, सुप्रिम कोर्टाचे निर्देश)

मुले खरेदी विक्री करण्याचे हे रॅकेट मागील काही वर्षांपासून सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या टोळीने ८ नाही तर अनेक मुलांची विक्री केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (Drug Crime Branch)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.