मागील अनेक दिवसांपासून राज्यात अमली पदार्थ सेवनाचे प्रमाण वाढले आहे. हे अंमलीपदर्थ पुरवणाऱ्या तस्करांचे प्रमाण सुद्धा वाढू लागले आहे. यामध्ये गांजा, बटन गोळ्या (Button Pills), सीरप आदीं अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याच संदर्भात औरंगाबाद येथील जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बटन गोळ्या विक्री करणार्यास अंमलीपदार्थ प्रतिबंध पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेल्या ९०० बटन गोळ्या जप्त करण्यात आल्याची माहिती पथकाच्या प्रमुख पोलिस निरीक्षक गिता बागवडे यांनी दिली.
शहरातील अंमलीपदर्थ विक्री करणार्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी अंमलीपदार्थ प्रतिबंध पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने गेल्या काही दिवसांपासून शहरातील नशेखोरांच्या विरुद्ध कारवाई सुरू केली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात कारवाई करून गांजा, बटन गोळ्या, शिरप आदीं जप्त केले आहेत.
जिन्सी पोलिस ठाण्याच्या (Jinci Police Station) हद्दीत गफुर खान ऊर्फ बाबा करीम खान (३७,रा. मिनारा मस्जिद वैâसर कॉलनपी गल्ली नं.२) हा नशेच्या बटन गोळ्याची विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून ९०० बटन गोळ्या जप्त केल्या. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदरील गोळ्या वैसर कॉलनीतील अकबर शेख, ऊर्फ बादशाह पाशा शेख हा नांदेडहुन त्याच्या ओळखीच्या गोविंद शेट नावाच्या व्यक्तिच्या मेडिकल स्टोअरमधून आणून देतो. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन जिन्सी पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या स्वाधीन केले.
(हेही वाचा – ई-मेल किंवा सोशल मीडियावर लिहिलेल्या आक्षेपार्ह शब्दांनीही महिलांच्या विनयशीलतेचा अपमान ठरतो; Bombay High Court चा निर्णय)
ही कारवाई पोलिस निरीक्षक गिता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलिस हवलदार लालखान पठाण, पोलिस अंमलदार सतीष जाधव, संदीपान धर्मे, महेश उगले, विजय त्रिभवून, छाया लांडगे यांच्या उपस्थितीत कारवाई झाली.
हेही पाहा –
https://www.youtube.com/watch?v=WDsJml48i0o
Join Our WhatsApp Community