PUNE: पब्जवर कारवाई, पण अजूनही सर्रास ड्रग्ज विक्री? नामांकित हॉटेलमधला व्हिडिओ व्हायरल

168
PUNE: पब्जवर कारवाई, पण अजूनही सर्रास ड्रग्ज विक्री? नामांकित हॉटेलमधला व्हिडिओ व्हायरल

कल्याणीनगर पॉर्शे अपघातानंतर पुण्यातल्या (PUNE) पब्जवर कारवाई करण्यात आली, पण अजूनही पुण्यातील हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री (CRIME) सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे शहरात शनिवारी, (२२ जून) रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज सेवन केले जात असल्याचे दिसते आहे. पुण्यातील एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधला हा व्हिडिओ समोर आला आहे.

या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज सदृश पदार्थ घेताना आढळून आले आहेत. तसेच अनेक अल्पवयीन मुलांना दारू देखील दिली जात होती. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर याबाबतचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.

(हेही वाचा – Mumbai-Goa Highway: परशुराम घाटातील घरांना दरडींचा धोका; नेमकी परिस्थिती काय? )

पुणे (PUNE) शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज घेतले जात असल्याचे द स्कूपच्या (The Scoope) स्टिंग ऑपरेशनमध्ये (sting operation)समोर आले आहे. पोलीस आयुक्तांच्या सूचना आणि उत्पादन शुल्क विभाग (Excise department)चे सर्व नियम धाब्यावर बसवून पुण्यातील एफसी (FC) एल -३ रोडवरील लिक्विड लेझर लाउंज (L3 – Liquid Leisure Lounge)मध्ये शनिवारी, (२२ जून) पहाटे ५ वाजेपर्यंत एका हॉटेलमध्ये खासगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये काही तरुण टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले, तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पब्स आणि रुफटॉप्स मालकांना याविषयी सक्त ताकीद दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हॉटेल मालक आणि पार्टी आयोजकांची चौकशी सुरू
या हॉटेलवर पोलीस आणि एक्साईज विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. हॉटेल मालक आणि पार्टी आयोजकांची चौकशी सुरू आहे. याआधी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे पुण्यातील ससून रुग्णालय वादात सापडलं होतं. तर कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता. विशाल अग्रवाल या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोघांना चिरडलं, यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.