सराईत ड्रग्ज तस्कर स्थानबद्ध; Mumbai Police दलातील पहिलीच कारवाई

45
सराईत ड्रग्ज तस्कर स्थानबद्ध; Mumbai Police दलातील पहिलीच कारवाई
  • प्रतिनिधी 

चेंबुरमधील पोलीस अभिलेखावरील सराईत अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद इकलाख बशीर शेख उर्फ मोहम्मद इकलाख मोहम्मद इस्राईल शेख उर्फ मुसा उर्फ सलमान उर्फ अकलाख (३४) याच्यावर स्थानबद्धची कारवाई करण्यात आरसीएफ पोलिसांना यश आले आहे. ड्रग्ज तस्कराला स्थानबद्ध करण्याची मुंबई पोलीस आयुक्तालयातील ही पहिली कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले, तसेच पोलीस ठाणे स्तरावर करण्यात आलेली ही देशातील पहिली कारवाई असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. (Mumbai Police)

(हेही वाचा – निवडणुकीआधी CM Eknath Shinde उमेदवारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद इकलाख विरोधात शहरात अंमली पदार्थ तस्करीचे सात गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्यावर स्थानबद्ध कारवाई करण्यासाठी आरसीएफ पोलिसांनी मुंबई पोलीस आयुक्तांना प्रस्ताव सादर केला होता. पोलीस आयुक्तांनी प्रस्ताव स्क्रिनिंग कमिटीला सादर केला. स्क्रिनिंग कमिटीने मान्यता देऊन हा प्रस्ताव गृह विभागाच्या प्रधान सचिवांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला. (Mumbai Police)

(हेही वाचा – Mahayuti तील उमेदवारांची पहिली यादी पुढील आठवड्यात)

गृह विभागाचे प्रधान सचिवांकडे स्थानबद्ध अधिकारी तथा प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) यांनी १५ ऑक्टोबरला आरोपी मोहम्मद इकलाख विरोधात स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. त्यानुसार, आरसीएफ पोलिसांनी आरोपी मोहम्मद इकलाख याला बुधवारी ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध केले. आरसीएफ पोलीस ठाण्याचे प्रतिबंधक अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी ही कारवाई तडीस नेली आहे. (Mumbai Police)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.