Drug trafficking: अबब… खबऱ्याचा कॉल आला अन् ४९४ किलो गांजा झाला जप्त

369
Drug trafficking: अबब... खबऱ्याचा कॉल आला अन् ४९४ किलो गांजा झाला जप्त

मुंबई उपनगरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. यामध्ये अंमली पदार्थांची तस्करी किंवा अंमली पदार्थांची अवैध विक्रीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील तळोजा भागात घडली आहे. रायगड पोलिसांनी (Police) मोठी कारवाई केली असून ४९४ किलो गांजा जप्त (Taloja 494 kg of ganja seized) केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) तळोजा येथून तब्बल १ कोटी रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना वाहनासह ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.  (Drug trafficking)

(हेही वाचा – Western and Eastern Expressway : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या देखभालीची कामे मुंबई आयआयटीच्या नजरेतून)

पनवेल (Panvel) येथील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने दिलेल्या माहितीनुसार १२ जून रोजी सायंकाळी पनवेल मुंब्रा हायवेच्या डाव्या बाजूस असलेल्या स्टार वेल्डींग वर्कसच्या समोर छापा टाकला. या धाडीत गांजा या अंमली पदार्थाचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ७ वाजता तळोजा याठिकाणी छापा टाकला असता एक महिन्द्रा कंपनीची XUV 500 गाडीमध्ये दोन आरोपी इसमांसह पांढऱ्या रंगाच्या नायलॉन गोण्यामध्ये अंदाजे ४९४ किलो, १ कोटी रूपयांपेक्षा जास्त किंमती गांजाचा साठा मिळून आला. सदर आरोपींच्या ताब्यातून एकूण १,१३,९०,००० रुपये किंमतीचा गांजा, वाहन व मोबाईल असा मुद्देमाल एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये जप्त करण्यात आला आहे. 

(हेही वाचा – भाजपा निर्विवादपणे महाराष्ट्रात महायुतीला यश मिळवून देईल; Pravin Darekar यांनी व्यक्त केला विश्वास)

यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करत गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक केली  आले आहे. या आरोपींविरूध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8 (क), 20 (ब) (II), 29 तसेच भा.द.स. कलम ३२८ अन्वये त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयामध्ये आंतरराज्यातील  टोळीचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. वरिष्ठ पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.(Drug trafficking)    

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.